लोकसभेत जीएसटी विधेयक आणि पीएमएलए कायद्यातील तरतूदींवरून लोकसभेत चर्चा सुरु होती. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे दृष्य पहायला मिळाले, भागवत कराड माझ्या राज्यातून येतात असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी जीएसटीबाबत काही त्रुटी असेल तर तुम्ही तातडीने त्या व्यक्तीला तुरुंगात टाकण्यावर …
Read More »राष्ट्रवादी म्हणते, दरवाढीऐवजी देशाच्या अर्थमंत्री काश्मीर फाईल्सवर बोलतात यावरून… मोदीजी कुठे आहेत अच्छे दिन राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासेंचा सवाल
पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे निकाल जाहिर झाल्यानंतर १० दिवसांनी केंद्र सरकारने डिझेल, घरगुती गॅस आणि पेट्रोलच्या दरात वाढ करण्यास सुरुवात केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला असून पाच दिवसात ३ रूपये २० पैशांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ तर घरगुती गॅसच्या दरात ५० रूपयांची …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावरील धाडीवरून केद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले… मंत्र्याला अडचणी आणतो तो मेहुणा अशी कबुली दिली
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालमत्तांवर ईडीने धाड टाकत ६ कोटी ४५ लाख रूपयांची मालमत्ता जप्त केले. ईडीने मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकावर धाड टाकत कारवाई केल्याची बहुधा ही पहिलीच घटना असावी. यापार्श्वभूमीवर सांगली येथील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते नितीन …
Read More »सीएनजी आणि पाईपलाईन गॅस वापरणाऱ्यांना दिलासा: १ एप्रिलपासून मिळणार स्वस्तात ‘सीएनजी’ वरील व्हॅट १३.५ ऐवजी आता ३ टक्के झाल्याने राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार; १ एप्रिलपासून नवे दर
राज्याचा २०२२-२३ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यात सीएनजी गॅस वाहनधारक आणि पाईपलाईनद्वारे गॅसवरील व्हॅट दरात घट करण्याची घोषणा केली होती. या घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिल २०२२ पासून सुरु करण्यात येत असून यासंबधीचे गॅजेटमध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून राज्यात सीएनजी गॅस …
Read More »उदगीर येथे होणाऱ्या साहित्य संमेलनाला हे १० आमदार देणार १ कोटी ५५ लाख रूपये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा आमदारांचा समावेश
आगामी मराठी साहित्य समेंलन उदगीर येथे होत आहे. या साहित्य समेंलनासाठी निधीची आवश्यकता आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपा मधील १० आमदारांनी १ कोटी ५५ लाख रूपये देण्याचा निर्णय घेत तसे विनंती पत्र संबधित जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे मराठी साहित्य संमेलन होवू …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंनी लावली विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या “या” खर्चाची चौकशी मेट्रो प्रकल्पातील १० हजार कोटी रूपयांची वाढ कशी?
मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांसह संबधित नेत्यांच्या विरोधात ईडीच्या कारवाया सुरु झाल्या. त्यातच आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या विरोधातही ईडीने कारवाईला सुरुवात झाली. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल विधानसभेत भाजपासह फडणवीसांच्या विरोधात चौफेर हल्ला चढविल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातील मेट्रो प्रकल्प किंमतीच्या चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे …
Read More »शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनासंदर्भात अभ्यासगटाची नियुक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
राज्य शासनामध्ये १ नोव्हेंबर २००५ पूर्वी कंत्राटी, तदर्थ हंगामी नियुक्ती असलेले व नंतर सेवेत घेतलेल्या किंवा कायम झालेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन देण्यासंदर्भात शासनाने १९ जानेवारी २०१९ रोजी वित्त राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एका अभ्यासगट समितीची स्थापना केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. उपमुख्यमंत्री …
Read More »मराठा आरक्षण : राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन अशोक चव्हाण यांची विधान परिषदेत माहिती
राज्य मागास वर्ग आयोगाचे लवकरच गठन होणार असून, त्यामार्फत मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अभ्यास केला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीतील तर ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात विधान परिषदेत नियम ९७ अंतर्गत झालेल्या अल्पकालीन चर्चेला …
Read More »अजित पवार आणि अनिल परब यांनी दिली एसटी कर्मचा-यांना आता शेवटची संधी ३१ मार्चपर्यंत कामावर येण्याची शेवटची संधी अन्यथा कठोर कारवाईचा इशारा
अधिवेशनाच्या कार्यकाळात भाजपाच्या आशिष शेलार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर आज विधानसभेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने निवेदन करत एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा आणि परत कामावर हजर व्हावे असे आवाहन करत ३१ मार्च पर्यत कामावर हजर होणाऱ्यांना सेवेत सामावून घेणार असल्याचा अंतिम अल्टीमेटम दिला. तर विधानभवानतील विधिमंडळ …
Read More »अजित पवार म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचा चान्स गेला भाजपाच्या नेत्यांना चिमटे, टोलेबाजीने
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलल्यानंतर उर्वरीत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलीच विरोधकांची चांगलीच फिरकी घेत टोलेही लगावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, काही काळा आधी उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री होण्याची संधी होती (खडसेंबाबत उद्देशून बोलत). मात्र आता ती गेली. मात्र …
Read More »
Marathi e-Batmya