पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीवरून सुप्रिया सुळे म्हणाल्या, दर महिन्याला निवडणूका… साधला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा

पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचा निकाल लागत पाच पैकी चार राज्यात भाजपाने पूर्ण बहुमताने सरकारे स्थापन केली. त्यानंतर केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात एकदम २५ रूपये तर डिझेलच्या १० रूपये तर पेट्रोलच्या दरात ८० पैशाने वाढ केली. त्यामुळे आधीच कोरोना संसर्ग रोखण्याच्या नावाखाली लादण्यात आलेल्या निर्बंधामुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेचे या दरवाढीमुळे अर्थकारण बिघडविले.विशेष म्हणजे या पाचही राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नोव्हेंबर २०२१ पासून पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरात वाढ होवू दिली नाही. मात्र १० मार्चला निवडणूकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर दरवाढीबाबत केंद्र सरकारनेच १० दिवसांची विश्रांती घेतली आणि त्यानंतर एकदम या तिन्ही गोष्टींच्या दरात एकदम वाढ केली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधत म्हणाल्या, जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्र सरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. त्यामुळे दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्र सरकार तिकडे व्यस्त राहील असा उपरोधिक टोला लगावला.

देशातील वाढत्या दरवाढी संदर्भातील मुद्यावरून संसदेत विरोधकांकडून केंद्र सरकारविरोधात गोंधळ घालण्यात येत आहे. तसेच सभागृहाचे कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्नही होत आहे. या वाढत्या दरवाढीच्या मुद्यावर सुप्रिया सुळे या लोकसभेत बोलत होत्या.

जेव्हा निवडणूका असतात तेव्हा केंद्रसरकार गॅस, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करत नाही. आपण दर महिन्याला निवडणूक लावा म्हणजे केंद्रसरकार तिकडे व्यस्त राहिल परिणामी गॅस, पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाहीत असा खोचक टोला केंद्र सरकारला त्यांनी लगावला.

लोकसभेत गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा मुद्दा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी आज मांडला.

केंद्र सरकारला पाच राज्यातील जनतेने बहुमत देऊन विजयी केले. पण निवडणूका संपताच केंद्र सरकारने पेट्रोल,डिझेल आणि गॅसची दरवाढ केली. महागाईचा कहर असतानाच ही दरवाढ लादण्यात आली आहे असा आरोपही त्यांनी केला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल, पंतप्रधान मोदी पनौती तर मुख्यमंत्री फडणवीस खोटारडे, पेट्रोल डिझेल आहे तर पंपावर रांगा कशासाठी ? पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस पक्षाचे दादरमध्ये मोठे आंदोलन व रास्ता रोको

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी LPG व सीएनजी मध्ये भरमसाठ दरवाढ करून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *