अमेरिका, इस्त्रायल, इराण युद्धानंतर जगाचे समिकरणच बदलले जाणार आहे. जग आता दोन शक्तीमध्ये विभागलेले राहिले नाही तर जग आता बहुधृवीय झाले आहे आणि त्याची सुरुवात २०१३ पासूनच झालेली आहे. अमेरिकेने महायुद्ध व शीतयुद्ध जिंकले आहे पण जग आता पूर्णपणे बदलले आहे, जगाचे नेतृत्व बदलले आहे. रशिया, चीन अमेरिकेबरोबर इतर शक्तीही …
Read More »त्या सहा खासदारांच्या शिंदे शिवसेनेतील विलनीकरणास लोकसभाध्यक्षांची मान्यता पावसाळी अधिवेशन सुरु होण्या आधीच दिली मान्यता
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाला मोठा धक्का बसला असून शिवसेना उबाठामधून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केलेल्या सहा खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेतील विलीनीकरणाला पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत औपचारिक मान्यता दिली. लोकसभा सचिवालयाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार, अध्यक्षांच्या या निर्णयामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे …
Read More »अभिजीत दीपके यांच्यावर एका महिलेकडून शाईफेक, दीपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा सोनम वांगचूक यांना पोलिसांनी हटविल्यानंतर छोटे खानी सभेत बोलताना दीपके यांच्यावर शाईफेक
कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांच्यावर शनिवारी दिल्लीच्या जंतर मंतर येथे समर्थकांना संबोधित करत असताना एका हिंदूत्ववादी महिलने शाई फेकली. कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांना २१ दिवसांच्या उपोषणानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही तासांतच घडलेल्या या घटनेमुळे आंदोलनस्थळी गोंधळ उडाला. अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये ते …
Read More »अभिनेता आमिर खानला बिश्नोई टोळीच्या अर्झु उर्फ टायसन बिश्नोईची धमकी लव्ह जिहाद प्रकरणावरून धमकी दिल्याचे सांगण्यात येतेय
सोशल मीडिया पोस्ट आणि ऑनलाइन समोर आलेल्या एका ऑडिओ क्लिपनुसार, अभिनेता आमिर खानला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील सदस्यांकडून धमकी मिळाली आहे. लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अर्झू बिश्नोई याने टायसन बिश्नोई नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हायरल पोस्टनुसार, आमिर खानला इशारा देण्यात आला आहे. अर्झू बिश्नोईचा आवाज असलेली एक ऑडिओ …
Read More »वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे आग्मो यांचा आरोप, चाचण्याचे रिपोर्ट्स देत नाहीत चाचण्या केल्या पण रिपोर्ट्स देण्यास नकार देत असल्याचा गीतांजली जे. आंग्मो यांचा आरोप
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने जंतरमंतर येथील आंदोलनस्थळावरून संफरदरजंग रूग्णालयात हलवित त्यांचे उपोषणाचे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. सोनम वांगचुक यांना सफदरजंग रूग्णालयात पोलिसांनी हलविल्यानंतर त्यांच्या पत्नी, गीतांजली जे. आंग्मो यांनी सरकारी सफदरजंग रुग्णालयात त्यांच्या पतीवर केल्या जाणाऱ्या आरोग्य तपासण्यांबाबत शंका उपस्थित केली. तसेच सोनम वांगचुक यांच्यावर …
Read More »पेपरफुटीची जबाबदारी टाळण्यासाठी आंदोलनस्थळावरून अखेर सोनम वांगचुक यांना उचलले पांढऱ्या रंगाचे पडदारूपी भिंतीचे कडे करत पोलिसांनी सोनम वांगचूक यांना जंतरमंतरवरून उचलून थेट सफदरजंग रूग्णालयात हलविले
नीट परिक्षेसह अन्य परिक्षांच्या पेपर फुटीच्या विरोधात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि कार्यकर्त्ये सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे उपोषणाचे आंदोलन सुरु केले. तसेच २० जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या दिवशी संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीने जाहिर केले …
Read More »अर्थखात्यावरून महायुतीत घमासान; शिंदेंचा विरोध, राष्ट्रवादी आग्रही खात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष आग्रही
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अर्थखात्यावरून महायुतीत पडद्यामागील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष अर्थखाते मिळावे, यासाठी आग्रही असून या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा होणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, अर्थखाते राष्ट्रवादीकडे देण्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली …
Read More »जपानच्या माजी मंत्री हिदेही माकिहारा यांचा आरोप, बुलेट ट्रेनला उशीर केवळ भारतामुळेच एका भारतीय मंत्री आणि अधिकाऱ्यांमुळे प्रकल्पाला उशीर
एका माजी जपानी मंत्र्याने महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील कथित “विलंबा”साठी एका भारतीय मंत्र्याला आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी १५ जुलै रोजी त्यांच्यावर “पूर्णपणे बेजबाबदारपणा” केल्याचा आरोप केला. शिंकांसेन प्रकल्पावरील वाटाघाटींदरम्यान अधिकाऱ्यांनी वारंवार दिलेली आश्वासने पाळली नाहीत आणि “स्वार्थाचा” पाठपुरावा केला, असा आरोप त्यांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, सिंचन प्रकल्प वेळेत पूर्ण करा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत २० प्रकल्प पूर्ण; ४.३० लाख हेक्टर सिंचन
राज्यातील सिंचन प्रकल्पांसाठी शासन मोठ्या प्रमाणात तरतूद करत असून हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. बैठकीस जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील, जलसंपदा मंत्री (तापी कोकण पाटबंधारे महा विकास महामंडळ) गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे …
Read More »वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा अडथळा आणल्यास तीन वर्षाची शिक्षा राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक विधेयक आगामी पावसाळी अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता
भारताचे राष्ट्रगीत वंदे मातरमचा अपमान केल्यास किंवा त्यात अडथळा आणल्यास, तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. ही तरतूद सरकार संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असलेल्या विधेयकाच्या केंद्रस्थानी आहे. ‘राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक (सुधारणा) विधेयक’ एकदा मंजूर झाल्यावर, वंदे मातरमला राष्ट्रगीत, तिरंगा आणि संविधानाप्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळेल. हे विधेयक …
Read More »
Marathi e-Batmya