उन्हाळ्यात विजेच्या वाढत्या मागणीच्या कालावधीत आणि पावसाळी परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून वीज यंत्रणेशी संबंधित विविध देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे सध्या वेगात सुरु आहे. मात्र उन्हाचा तडाख्यात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीचे पूर्वनियोजित कामे संबंधित दिवशी सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान करावेत असे निर्देश मुख्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना शनिवारी …
Read More »सचिन सावंत यांचा सवाल, महाराष्ट्रात एमएसआरटीसीचे विलिनीकरण कधी करणार? तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय, मविआ सरकार असताना एसटीच्या विलिनिकरणाच्या बाता मारणारे भाजपाधार्जिणे नेते आता गप्प का?
काँग्रेसच्या तेलंगणा सरकारने रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तसेच फारकाळ कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सहभागी करण्यात येणार आहे. काँग्रेस पक्षाने आपल्या जाहिरनाम्यात दिलेले अजून एक आश्वासन तेलंगणा सरकारने पूर्ण केले आहे. महाराष्ट्रातील एस.टी. महामंडळ राज्य सरकारमध्ये …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे झाला. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न …
Read More »नरहरी झिरवाळ यांचे आदेश, हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’ वापराचा उल्लेख बंधनकारक महाराष्ट्रापाठोपाठ केंद्र सरकारच्या अन्न सुरक्षा व नियामक प्राधिकरणाकडूनही सूचना
पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन नियमांनुसार, प्रत्येक हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रेस्टॉरंटला त्यांच्या मेन्युकार्ड, इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर याबाबत स्पष्ट माहिती द्यावी लागेल. जर पदार्थात नैसर्गिक पनीर, चीजऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरले असेल, तर त्याचा उल्लेख करणे आता कायदेशीररित्या बंधनकारक करण्यात आले आहे. …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, कुंभमेळा कामांना अधिक गती देणार मुख्यमंत्र्यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी काळात या कामांना अधिक गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन पूजा केली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण महाराजांच्या अवमानाबद्दल भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री, मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरी व सरसंघचालकांनी जाहीर माफी मागा
भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्रीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेले विधान अत्यंत आक्षेपार्ह असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत हा अशास्त्री बरळला तरीही त्यावर या तिघा नेत्यांनी साधा निषेधही नोंदवला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे हे भाजपा आरएसएसचे राष्ट्रीय धोरण असून महाराजांचे विचार …
Read More »वसंतदादा शुगर अर्थात VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बाळासाहेब थोरात, राजेश टोपे यांच्यासह शास्त्रज्ञांचा सहभाग
महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासदौऱ्याची तयारी पूर्ण झाली असून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI), पुणे येथील उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ २६ एप्रिल २०२६ ते ८ मे २०२६ या कालावधीत ऑस्ट्रेलियातील शुगर रिसर्च ऑस्ट्रेलिया (SRA) या जागतिक स्तरावरील अग्रगण्य ऊस संशोधन संस्थेला भेट देणार आहे. या …
Read More »ऊर्जा परिवर्तनातून राज्याच्या सामाजिक व आर्थिक क्षेत्राला बळ महावितरणचा दोन पुरस्कारांनी सन्मान
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात राज्याच्या सामाजिक व आर्थिक विकासामध्ये ऊर्जा परिवर्तनाद्वारे दिलेल्या विशेष योगदानाची दखल घेत महावितरणचा ‘मागेल त्याला सौर कृषिपंप’ योजनेसाठी ‘रिन्यूएबल एनर्जी इनिशिएटिव्ह ऑफ द इयर’ तसेच प्राधान्य दराच्या वीजखरेदीमध्ये ६५ टक्के स्वस्त व शाश्वत अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केल्याबद्दल ‘क्लीन एनर्जी अँड रिन्यूएबल अडॉप्शन अवॉर्ड’ने गौरविण्यात आले. …
Read More »मंत्री अतुल सावे यांची माहिती, भटके-विमुक्त समाजाच्या समस्या निवारणासाठी त्रिस्तरीय समित्या अत्याचार प्रतिबंध व तक्रार निवारणावर भर
राज्यातील भटके-विमुक्त समाजाच्या समस्या प्रभावीपणे सोडविणे, त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच या समाजावर होणाऱ्या अमानवीय अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी त्रिस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्री अतुल सावे म्हणाले, राज्यस्तर, जिल्हास्तर आणि उपविभाग स्तरावर समित्यांच्या माध्यमातून भटके-विमुक्त समाजाच्या तक्रारींचे …
Read More »मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती
जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले. धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावरील …
Read More »
Marathi e-Batmya