सोलापूरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास व त्यासाठी सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तरावरचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. सोलापूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचे नाव यापुढे शासकीय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था (गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँण्ड टेक्नॉलॉजी), …
Read More »आदिवासींच्या ५ प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिकमध्ये, १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिकमध्ये श्रेणीवाढ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांकडून चालविण्यात येणाऱ्या पाच प्राथमिक आश्रमशाळांची माध्यमिक स्तरापर्यंत आणि १९ माध्यमिक शाळांची उच्च माध्यमिक – कनिष्ठ महाविद्यालय स्तरापर्यंत श्रेणीवाढ करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निर्णयामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठा हातभार लागणार आहे. या आश्रमशाळांची श्रेणीवाढ केल्याने …
Read More »पत्नीच्या जाचाला कंटाळून न्यायाधीश अमन शर्मा यांनी केली आत्महत्या वडिलांचा अपमान केल्याने न्यायाधीश झाले होते अस्वस्थ
“आता जगणे अशक्य आहे,” असे दिल्लीस्थित न्यायाधीश अमन शर्मा यांनी आपल्या वडिलांना शेवटच्या फोन कॉलवर सांगितले होते. पत्नीने वडिलांचा केलेला अपमान सहन न झाल्याने त्यांनी आत्महत्या करण्याच्या काही दिवसांपूर्वी हे सांगितले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. दिल्लीत कार्यरत असलेले न्यायाधीश आणि अलवरचे रहिवासी असलेले अमन शर्मा यांनी २ मे रोजी आत्महत्या …
Read More »इराणची स्पष्टोक्ती, आता चेंडू अमेरिकेच्या ताब्यात, पण इराण दोन्ही गोष्टींसाठी तयार शांती आणि युद्ध या दोन्ही गोष्टींसाठी तयार
अमेरिकेने तेहरानच्या ताज्या शांतता प्रस्तावावर साशंकता दर्शवल्यानंतर, पुढील पाऊल वॉशिंग्टनच्या हातात आहे, असे इराणने म्हटले आहे. इराणचे उप परराष्ट्र मंत्री काझेम गरीबाबादी यांनी तेहरानमधील राजनैतिक अधिकाऱ्यांना सांगितले की, “मुत्सद्देगिरीचा मार्ग निवडायचा की संघर्षात्मक दृष्टिकोन सुरू ठेवायचा, हे आता अमेरिकेच्या हातात आहे,” आणि इराण “दोन्ही मार्गांसाठी तयार आहे.” अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड …
Read More »अनिल देशमुख यांचा सवाल, राज्यात कायद्याचा धाक उरलाय की नाही? २४ तासात दोन घटना घडल्या
पुणे जिल्ह्यातील नसरापूर (भोर) येथे साडेतीन वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने केलेला अत्याचार आणि तिची निघृण हत्या, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्र दिनी अशी लाजीरवाणी घटना घडणे हे राज्यासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.या घटनांवरून राज्यात कायद्याचा धाक शिल्लक आहे की नाही,असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, एल आय टी जगाला उत्तम इंजिनियर्स देईल एल आय टी च्या प्रस्तावित संकुलाचे भूमिपूजन
आठ दशकांपासून कार्यरत असलेल्या लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ चे विद्यार्थी आज जगभरात आहेतच, परंतु भविष्यातही देशाला व जगाला उत्तम इंजिनियर्स देण्याचे काम एल आय टी करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय सुविधांच्या एकत्रित बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते …
Read More »दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ महावितरणची प्रसिद्धीपत्रकान्वये माहिती
राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक ग्राहक एकूण १५३४ कोटी रुपयांच्या लाभासह प्रथम स्थानावर आहेत, अशी माहिती महावितरणतर्फे देण्यात आली. …
Read More »शेतकरीविरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेसची ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली मानेगाव ते जळगाव जामोद पदयात्रा
केंद्रातील व राज्यातील भाजपा महायुतीच्या मागील १२ वर्षांच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही व दुसरीकडे महागाईने शेती करणे कठीण झाले आहे. देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत तरीही भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी काहीही करत नाही. शेतकरी विरोधी भाजपा सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, महिला व मुलींवरील अत्याचार रोखण्यात भाजपा सरकार अपयशी फडणवीसांनी थापा मारण्यापेक्षा कृती करावी, महिला सुरक्षेवर भाजपा सरकार गंभीर नाही, महिला अत्याचार रोखण्यासाठी बनवलेला शक्ती कायदा मोदी सरकारकडे मंजूरीसाठी पडून..
पुण्यातील ४ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तीची हत्या करण्यात आल्याची घटना संताप आणणारी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे, अशा नराधमांना फाशीच दिली पाहिजे. राज्यात कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे सांगण्यास ही घटना पुरेशी आहे. दररोज महिला अत्याचाराच्या घटना होत आहेत पण प्रत्येक घटनेनंतर कडक कारवाई करू व विरोधकांनी राजकारण करू नये …
Read More »नसरापूर अत्याचार प्रकरणी बाल हक्क आयोग सक्रिय कठोर शिक्षेसाठी विशेष सरकारी वकील नियुक्तीची शिफारस
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या सदस्या शुभांगीताई तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देऊन तिच्या पालकांशी व नातेवाईकांशी संवाद साधला. यावेळी आयोगाच्या वतीने कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करण्यात आल्या. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोग …
Read More »
Marathi e-Batmya