Breaking News

दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन, वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था स्थापणार कोकणातील उच्च कृषी शिक्षणाला मिळणार नवी दिशा

कोकणातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर कृषी शिक्षण आणि अत्याधुनिक संशोधनाच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठांतर्गत रत्नागिरीतील वाकवली येथे नवीन शासकीय कृषी विज्ञान पदव्युत्तर संस्था उभारणे आवश्यक आहे. या संस्थेमुळे कृषी संशोधन, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल. त्यामुळे याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तातडीने तयार करून शासनाकडे सादर करावा, असे निर्देश …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, गतिमान भूसंपादन करून औद्योगिक विकासाला चालना द्यावी मुख्यमंत्र्यांनी घेतला एमआयडीसीअंतर्गत प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा

राज्यामध्ये नवीन औद्योगिक वसाहतींचा विस्तार वेगाने होत आहे. या विस्तारातूनच औद्योगिक विकास होणार आहे. त्यामुळे उद्योगांना आवश्यक जमीन वेळेत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. गतिमान भूसंपादन करून महाराष्ट्रात औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीअंतर्गत विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासंदर्भात आढावा बैठक …

Read More »

विभागीय माहिती कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरीच नाही माहिती अधिकारातून भोंगळ कारभार उघड ; शासन परिपत्रकाला हरताळ

कोरोना महामारी संपुष्टात आल्यानंतर राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली असताना, अमरावती येथील विभागीय माहिती कार्यालय, अमरावती येथे गेल्या तीन वर्षात बायोमेट्रिक हजेरी नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत बायोमेट्रिक हजेरी अहवाल मागविण्यात आलेल्या माहितीतून हा भोंगळ कारभार उघड झाला असून, …

Read More »

अभिजीत दीपके म्हणाले, आगामी काळात विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी लिसनिंग टूर दोन दिवसीय बैठकीतील चर्चे दरम्यान आगामी धोरण निश्चित पण राजकीय पक्ष म्हणून काम करणार नाही

कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ही संघटना ‘दबाव गट’ म्हणून काम करेल आणि राजकारणात उतरण्याची त्यांची कोणतीही तात्काळ महत्त्वाकांक्षा नाही अशी माहिती कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आज दिली. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर येथे कॉकरोच जनता पार्टी-सीजेपीच्या दोन दिवसीय रणनीती बैठकीदरम्यान माध्यमांशी बोलताना, अभिजीत दीपके यांनी राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याचे …

Read More »

झारखंडचे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी सोनम वांगचूक यांच्या सूचनेनुसार उपोषण सोडले नियमित स्पर्धा परिक्षा व्हाव्यात म्हणून विद्यार्थ्याचे आंदोलन

झारखंडचे विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो, जे जेपीएससी (JPSC), जेएसएससी सीजीएल (JSSC CGL) आणि इतर राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेवर कारवाईच्या मागणीसाठी ३ जुलैपासून अनिश्चित काळासाठी उपोषणावर आहेत, त्यांनी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर बुधवारी पाणी पीत उपोषण सोडले. देवेंद्र नाथ महतो यांच्यासोबत १० मिनिटांच्या व्हिडिओ कॉलमध्ये, सोनम वांगचुक यांनी आंदोलन …

Read More »

भारत आणि म्यानमार सीमा मोजणी न झालेल्या भागाची अदला बदली करणार दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु असल्याच्या वृत्तावर परराष्ट्र प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांची माहिती

मणिपूरलगतच्या सामायिक सीमेवरील अनेक दशकांपासून सीमांकन न झालेल्या भागाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत आणि म्यानमार संभाव्य भूभाग अदलाबदलीचा (territorial exchange) विचार करत असल्याचे वृत्त आहे. मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले, “सीमेवर असे काही भाग आहेत ज्यांचे सीमांकन अद्याप निश्चित झालेले नाही. त्या क्षेत्रांबाबत …

Read More »

केंद्र सरकारचा मेटाला इशारा, मार्क झुकरबर्गने माफी मागावी अन्यथा कायदेशीर संरक्षण गमवावे लागेल उच्चाधिकार समितीची मेटाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिला इशारा

बुधवारी मेटाच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेसबुक व्हिडिओ काही काळासाठी हटवल्याचा आणि बाल लैंगिक शोषणाचे साहित्य रोखण्यात आलेल्या त्रुटींवर आवाज उठवला. फेसबुक आणि इंस्टाग्रामची मालकी असलेल्या मेटाच्या कंटेंट मॉडरेशन पद्धतींवर वाढत्या तपासणीच्या पार्श्वभूमीवर सुमारे ४५ मिनिटे चाललेली ही बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ आणि व्हिडीओचे रेकॉर्डिंग परवानगी शिवाय वापरता येणार नाही रेकॉर्डिंगसाठीच्या आदर्श नियमावली'चा स्वीकार करण्याबाबतचा सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे आदेश

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच स्पष्ट केले की, न्यायालयीन कामकाजाच्या ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या वापराचे नियमन करणाऱ्या त्यांच्या आधीच्या अंतरिम आदेशामुळे मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांना सुनावणीचे वार्तांकन करण्यापासून रोखले जात नाही. आधीच्या आदेशात पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयीन कामकाजाचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळवण्यावर आणि प्रसारित करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. तसेच, या निर्देशांचा परिणाम मान्यताप्राप्त वृत्तसंस्थांद्वारे …

Read More »

मुंबई वेधशाळेचा पाच दिवसांचा हवामान अंदाज; राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट राज्यातील 20 हून अधिक जिल्ह्यांना दिला इशारा

मुंबई वेधशाळेने पुढील पाच दिवसांसाठी राज्यातील हवामानाचा अंदाज जाहीर केला असून, काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि पावसाची शक्यता लक्षात घेऊन ऑरेंज व यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी हवामानाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. ५ ऑगस्ट रोजी रायगड जिल्हा व पुणे …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी भागांमध्ये सुरक्षित, आधुनिक आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यास मोठी चालना मिळणार असून भविष्यातील नागरी विकासाला गती मिळणार आहे. या दृष्टीने सदर प्रकल्प काम सुरू झाल्यापासून तीन वर्षात पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जावे असे निर्देश …

Read More »