सना मलिकच्या आमदारकीला आव्हान; उच्च न्यायालयाची विचारणा, निवडणूक आयोग ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा

महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीत मुंबईतील अनुशक्तीनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सना मलिक यांच्या आमदारकीला आव्हान देणाऱ्या याचिकेत निवडणूक आयोगाला पक्ष का बनवण्यात आले नाही?, असा प्रश्न उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना विचारला.

उच्च न्यायालयात वकील महेंद्र भिंगारदिवे यांनी सना मलिक यांच्या विजयाला आव्हान देणारी याचिका केली. शिवसेना (युबीटी) खासदार अनिल देसाई यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेत निवडणूक आयोगाला पक्षकार केल्यामुळे त्यांची मागील याचिका फेटाळण्यात आली होती अशी माहिती महेंद्र भिंगारदिवे यांनी न्यायालयाला दिली. परंतु, लोकप्रतिनिधी कायद्याचा संदर्भ देऊन निवडणूक आयोगाला पक्षकार बनवावे की नाही हे सिद्ध करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने भिंगारदिवे यांना दिले. तथापि, यासंदर्भात कोणतीही माहिती भिंगारदिवेकडे नसल्यामुळे आधी स्वतःला उच्च न्यायालयासमोर युक्तिवाद करण्यासाठी तयार करा, असा सल्ला देऊन उच्च न्यायालयाने सुनावणी ९ जूनपर्यंत तहकूब केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांनी त्यांचे नाव सना मोइनुद्दीन शेख असे नमूद करून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर मतदार यादीत त्यांचे नाव सना नवाब मलिक असे नोंदवले आहे. त्यामुळे, सना मलिक यांचे नामांकन रद्द करावे. सना मलिक यांचे नाव मतदार यादीत बदलून शपथपत्रातील त्यांच्या नामांकन नावाशी जुळणारे नावं लावावे, अशी मागणी महेंद्र भिंगारदिवे यांनी केली होती. सदर बाब त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निदर्शानास आणून दिली असता त्यांची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

About Editor

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा नीट-युजी परिक्षा संगणक आधारीत घेण्यास नकार एनटीएच्या प्रस्तावावर न्यायालयाची भूमिका

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (१ जून, २०२६) राष्ट्रीय चाचणी संस्थेला (NTA) NEET-UG २०२६ ची फेरपरीक्षा सध्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *