“पुण्यश्लोक अहिल्यादेवी” चित्रपटाच्या पोस्टरचे अजित पवारांच्या हस्ते अनावरण मराठी आणि हिंदी भाषेत तयार होणार चित्रपट

मुंबई: प्रतिनिधी
समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सिनेमामुळे त्यांचे कार्य, घरा-घरात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयात प्रकाशित करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, उद्योग राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, चित्रपटनिर्माते बाळासाहेब पाटील, दिग्दर्शक दिलीप भोसले उपस्थित होते.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जबाबदारी स्विकारून पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी राज्यकारभाराचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या जीवनावर मराठी व हिंदी सिनेमा तयार करण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

About Editor

Check Also

चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव या कलावंताना जाहिर, तसेच विशेष योगदान पुरस्कार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार; प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *