नव्या नाटकांचे नाट्यनिर्मितीचे अनुदान पुढील आठवड्यात मिळणार सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी
नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेअंतर्गत असणारे प्रयोग अनुदान पुढील आठवड्यात निर्मात्यांच्या खात्यात जमा होईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे. यासाठी चाळीस लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यामार्फत नाट्य अनुदान योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नवीन नाटके, संगीत नाटके, प्रयोगात्मक नाटके यांना निर्मितीसाठी अनुदान दिले जात असते. मात्र काही नवीन नाटकांना सदरील अनुदान मिळाले नव्हते. यासंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या असून लवकरच हे नाट्य अनुदान वितरित केले जाईल असे त्यांनी सांगितले.  सांस्कृतिक कार्य विभाग नेहमीच नाट्य कलावंत व निर्माते यांच्या पाठीशी उभा असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्य मंत्र्यांनी दिली.

About Editor

Check Also

चित्रपती व्ही. शांताराम व राज कपूर जीवनगौरव या कलावंताना जाहिर, तसेच विशेष योगदान पुरस्कार पं. हृदयनाथ मंगेशकर आणि सलीम खान यांना जीवनगौरव पुरस्कार; प्रसाद ओक व राणी मुखर्जी यांचा विशेष योगदान पुरस्काराने गौरव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणारे २०२५ चे ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ संगीतकार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *