माधुरीने गायले सुमेधच्या अभिनयाचे गोडवे बकेट लिस्टमध्ये माधुरीसोबत दिसणार

मुंबई : प्रतिनिधी

अश्विनी भावेंची मुख्य भूमिका असलेल्या ‘मांजा’ या सिनेमात आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर खलनायकी रंग भरणारा एक गोंडस चेहरा दिसला होता. सिनेमाइतकंच या खलनायकी भूमिकेतील या चेहऱ्याचंही सर्वांनी कौतुक केलं. सुमेध मुद्गलकर नावाचा हा अभिनेता आता लवकरच आणखी एका मराठी सिनेमात झळकणार आहे.

‘मांजा’पूर्वी राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या राजेश मापुस्करांच्या ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमात सुमेध दिसला होता. पण ‘मांजा’मध्ये त्याला खऱ्या अर्थाने मोठी भूमिका साकारण्याची संधी लाभली. चॉकलेटी लुकमुळे सध्या लाखों तरूणींची धडकन बनलेला हँडसम हंक सुमेध आता बॉलीवुडची ‘धकधक’गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दिक्षीतच्या ‘बकेट लिस्ट’ या सिनेमात दिसणार आहे. माधुरीला या सिनेमातील सुमेधचं काम खूप आवडलं आहे.

माधुरीने ट्विटरवरून सुमेधची प्रशंसाही केली आहे. ‘बकेटलिस्ट’ या सिनेमातील सुमेधचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना नक्कीच भावेल असं माधुरीने म्हटलं आहे. यावरून सुमेध कित्ती उत्तम अभिनेता आहे, हे लोकांसमोर सिध्द होईल असा विश्वास व्यक्त करीत माधुरीने त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.

खुद्द माधुरीकडून एवढी वाहवाही मिळाल्यावर सुमेध खूप खूश झाला आहे. तो म्हणतो, “माधुरी मॅमकडून अशी शाबासकी व्हावी, हे माझ्यासारख्या कोणत्याही नव्या अभिनेत्याचं भाग्यच म्हणावे लागेल. त्यांची जेवढी कारकिर्द आहे, तेवढं माझं वयही नाही आहे. पण त्यांनी सोशल मीडियावर येऊन अशी जाहिरपणे माझी स्तुती करावी, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.”

 

About Editor

Check Also

Bhabhi-Tabahi-song

Bhabhi Tabahi : या गाण्याला देसी टच आणि थोडी गंमत आहे 'भाभी तबाही'मधील यामी गौतमच्या नव्या शैलीबद्दल जी. व्ही. प्रकाश कुमार म्हणाले, 

मुंबई : संगीतकार जी. व्ही. प्रकाश कुमार सध्या त्यांच्या आगामी ‘नई नवेली’ या चित्रपटामुळे चर्चेत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *