फिल्मीनामा

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी” चित्रपटाच्या पोस्टरचे अजित पवारांच्या हस्ते अनावरण मराठी आणि हिंदी भाषेत तयार होणार चित्रपट

मुंबई: प्रतिनिधी समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी सिनेमामुळे त्यांचे कार्य, घरा-घरात पोहोचण्यास मदत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ या मराठी व हिंदी चित्रपटाचे पोस्टर उपमुख्यमंत्री …

Read More »

अखेर ” तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” करमुक्त चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान सिंह राठोड यांच्यात झालेल्या लढाईस महाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. सदर लढाईवरील “तान्हाजी – द अनसंग वॉरिअर” या चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यापूर्वी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्याने …

Read More »

राज्य नाट्य स्पर्धेत ‘शीमा’ नाटकाने मारली बाजी ठाणे विभागात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच झालेल्या ५९ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मानव विकास संस्था, वाशी निर्मित आणि पारमिता फाउंडेशन संस्था सादर ‘शीमा’ या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकासह चार पारितोषिके मिळाली. १५ नोव्हेंबर २०१९ ते ११ डिसेंबर २०१९ या स्पर्धेच्या कालावधीत …

Read More »

हौशी राज्य नाट्य स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन १५ नोव्हेंबरपासून प्राथमिक फेरी सुरु होणार

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या १५ नोव्हेंबर २०१९ पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून १ ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत. ५९ व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी १५ नोव्हेंबर, २०१९ पासून राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात …

Read More »

“सुपर ३०” हिंदी चित्रपट राज्यात टँक्स फ्री राज्य वस्तू व सेवाकरात सवलत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी बिहारमधील प्रसिद्ध गणितज्ज्ञ आनंदकुमार यांच्या कार्यावर आधारित “सुपर ३०” या हिंदी चित्रपटाला राज्य वस्तू व सेवाकरातून (एसजीएसटी) सवलत देण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. आनंदकुमार यांनी “रामानुजन स्कुल ऑफ मॅथेमेटिक्स्”च्या माध्यमातून बिहारमधील सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील हुशार विद्यार्थ्यांना जे.ई.ई. व तत्सम स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले. …

Read More »

व्यावसायिक नाट्य स्पर्धेत “सोयरे सकळ” प्रथम सांस्कृतिक विभागाची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी ३१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी रु. ७ लाख ५० हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे- जिगिषा आणि अष्टविनायक, …

Read More »

जीएंच्या लक्ष्मी कथेवरील विद्यार्थी-निर्मित लघुपटाला दोन पुरस्कार स्मिता तांबे लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेत; आतापर्यंत ६ आंतरराष्ट्रीय महोत्सवात निवड

मुंबई: प्रतिनिधी वरळी येथील एल एस रहेजा टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी निर्मिलेल्या, प्रसिद्ध लेखक जी ए कुलकर्णी यांच्या लक्ष्मी कथेवर आधारित लक्ष्मी या लघुपटाला चिपळूण येथील केएफटीआय आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दोन मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. विविधांगी भूमिकांनी चित्रपट सृष्टीत आपली छाप पाडणार्‍या स्मिता तांबे यांना या लघुपटात साकारलेल्या लक्ष्मीच्या प्रमुख भूमिकेसाठी …

Read More »

“दलित पँथर” चळवळीचा एक धगधगता इतिहास लवकरच रूपेरी पडद्यावर झळकणार

मुंबईः प्रतिनिधी १० एप्रिल ९७० ला दलितांवरच्या अन्याय अत्याचारा बाबतचा पेरुमल समितीचा अहवाल संसदेच्या पटलावर मांडण्यात आला. या अहवालानुसार एका वर्षात देशभरात ११७७ दलितांच्या हत्या झाल्याची नोंद अहवालात करण्यात आली. या अशा अन्याय- अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी १९७२ च्या काळात “दलित पँथर” नावाची संघटना स्थापन करण्यात आली. ही संघटना म्हणजे …

Read More »

“तमाशा महोत्सव” परभणीला आयोजित करण्याचा सांस्कृतिक कार्य खात्याचा घाट ?

मुंबई : प्रतिनिधी दरवर्षी वाशी (नवी मुंबई) येथे होणारा तमाशा महोत्सव थेट परभणी येथे आयोजित करण्याचा घाट सांस्कृतिक कार्य खात्यातील काही हट्टी अधिकाऱ्यांनी घाट घातला आहे. त्यामुळे यावर्षी नागरी भागातील कला रसिकांना तमाशा महोत्सवाला मुकावे लागणार आहे.    तमाशा सम्राज्ञी कै. विठाबाई नारायणगावकर यांच्या निधनानंतर दरवर्षी राज्य सरकारने त्यांच्या नावाने …

Read More »

बाळासाहेबां सारखा दुसरा स्टार नाही

अभिनेता आमिर खान यांचे मत मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र आणि मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार नसल्याचे मत हिंदी चित्रपटसृष्टीतील स्टार अभिनेता आमिर खान यांने व्यक्त केले. लवकरच बहुचर्चित शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील ‘ ठाकरे ’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक चित्रपट निर्माते, बड्या बँनरचे चित्रपट प्रदर्शित करणार …

Read More »