सफारी इंडस्ट्रीजकडून बोनस शेअर्स आणि लाभांशांची घोषणा दिवाळीच्या तोंडावर गुंतवणूकदारांना लाभ

लगेज कंपनी सफारी इंडस्ट्रीजच्या भागधारकांसाठी खूशखबर आहे. कंपनीने आपल्या भागधारकांना बोनस शेअर आणि लाभांश देण्याची घोषणा केली आहे. सफारी इंडस्ट्रीजने सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहे. निकाल जाहीर करताना कंपनीने बोनस शेअर्सही लाभांश देण्याची घोषणा केली.

सफारी इंडस्ट्रीज प्रत्येक शेअरसाठी एक बोनस शेअर देणार आहे. याशिवाय कंपनीने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २.५ रुपये लाभांश देण्याचे जाहीर केले आहे. लाभांशाची रेकॉर्ड तारीख १० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे, लाभाश ३० नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी भागधारकांच्या खात्यात पाठवला जाईल.

सफारी इंडस्ट्रीजला चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर ५३.७ टक्क्यांनी वाढून ३९.८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या कालावधीत महसूल १८ टक्क्यांनी वाढून ३७० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ऑपरेटिंग नफा किंवा EBITDA देखील या कालावधीत ५१.३ टक्क्यांनी वाढून ६३.४ कोटी रुपये झाला आणि EBITDA मार्जिन ३.७० टक्क्यांनी वाढून १७.१ टक्के झाला.

सफारी इंडस्ट्रीजचा शेअर्स गेल्या वर्षी २६ डिसेंबर २०२२ रोजी ५७६.४५ रुपयांच्या एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर होता, त्यानंतर तो १० महिन्यांत १८८ टक्क्यांनी वाढून ११ ऑक्टोबर २०२३ रोजी ४.५३५ रुपयांवर पोहोचला. हा त्याचा विक्रमी उच्चांक आहे.

About Editor

Check Also

महाराष्ट्राला मिळाला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त कर निधी केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत विकासकामांना अधिक गती मिळावी, या उद्देशाने केंद्र सरकारने आज सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *