निफ्टी प्रथमच १० हजार ७०० च्या वर विक्रमी पातळी ओलांडली

मुंबईः प्रतिनिधी

नवीन वर्षात देशातील शेअऱ बाजार रोज नवीन विक्रम बनवत आहे. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतामुळे सोमवारी शेअर बाजार पूर्ण दिवस उच्चांकी पातळीवर व्यवहार करत असल्याचे दिसून आले. दिवसाच्या अखेरीसही विक्रमी पातळीवर बाजार बंद होत निफ्टीने प्रथमच १० हजार ७०० च्या वर बंद झाला. तर सेन्सेक्सही २५१ अंकांनी वाढून ३४ हजार ८४३ या विक्रमी पातळीवर स्थिरावला. सोमवारी निफ्टीने ६० अंकांची वाढ नोंदवली.

सोमवारी आशियाई बाजारही उच्चांकावर पोहोचले. त्यामुळे भारतीय बाजारातही तेजी आली. एसबीआय, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, आयटीसी या कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या चांगल्या वाढीने बाजाराला सर्पोर्ट मिळाला. बँकांच्या शेअर्समधील तेजीने निफ्टी बँक इंडेक्स प्रथमच २६ हजारांच्या वर गेला.

मागील विक्रमी पातळी

१२ जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार ६३८.४२ ची नवीन पातळी गाठली.

तर निफ्टीने १० हजार ६९०.२५ वर गेला.

११ जानेवारीला निफ्टीने १० हजार ६६४.६० च्या उच्चाकांवर पोहोचला

९ जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार ५६५.६३ अंकाच्या नवीन पातळीवर पोहोचला

८ जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार ४८७.५२ च्या तर निफ्टीने १० हजार ६३१.२० च्या उच्चांकावर मजल मारली

५ जानेवारीला सेन्सेक्सने ३४ हजार १७५ आणि निफ्टीने १० हजार ५६६.१० या पातळीवर होता.

About Editor

Check Also

टाटा सन्सच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी एन.चंद्रशेखर यांना पुन्हा एकदा संधी पाच वर्षाचा कार्यकाळाला मंजूरी दिली

टाटा सन्सच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांच्या कार्यकारी अध्यक्षपदासाठी आणखी पाच वर्षांच्या कार्यकाळाला मंजुरी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *