कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांच्या उच्चांकावर प्रती बॅरल ७० डॉलरवर, आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली

नई दिल्लीः प्रतिनिधी

डिसेंबर २०१४ नंतर कच्च्या तेलाचे दर (क्रुड ऑईल) प्रथमच प्रती बॅरल ७० डॉलरच्या पुढे गेले आहेत. कच्च्या तेलाच्या वाढत्या भावामुळे आयात करणाऱ्या देशांची चिंता वाढली आहे. याचा परिणाम देशातही पेट्रोल, डिझेलचे भाव वाढण्यात होण्याची शक्यता आहे. मागील सहा महिन्यात कच्च्या तेलाच्या दरात तब्बल ५७ टक्के वाढ झाली आहे. जून मध्ये हा दर ४४.८४ डॉलर होता.

तेल उत्पादक ओपेक देशांसह रशियाकडून तेलाचे उत्पादन घटवण्यात आल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचा पुरवठा घटला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढून तीन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. ब्रेंट क्रूड आता ७० डॉलरच्यावर तर डब्ल्यूटीआय क्रूड ६४.५३ डॉलरवर गेले आहे.

तेलाचे भाव वाढल्याने भारताची तूट वाढू शकते. भारत आपल्या गरजेच्या ८२ टक्के तेल आयात करतो. कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढल्यास भारताचा आयात खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे.

महागाई वाढण्याची भिती

कच्च्या तेलाचे दर वाढल्याने महागाई वाढण्याचीही शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महागल्याने भारतातही दर वाढतील. तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या वाढीच्या दराचा भार ग्राहकांवर टाकतील. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आदींच्या किमती वाढतील. परिणाम महागाई वाढेल.

सरकारने ३ ऑक्टोबरला महाग होत असलेले पेट्रोल, ड़िझेल पाहून पेट्रोल आणि डिझेलवर २ रुपये प्रती लिटर अबकारी कर कमी केला होता. मात्र, त्यानंतर कच्चे तेल सातत्याने महाग होत आहे. ३ ऑक्टोबरनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात २७ टक्के वाढ झाली आहे. तर भारतात हे दर १७ टक्क्यांपेक्षा अधिक वाढले आहेत. या प्रमाणात देशात पेट्रोल, डिझेलच्या किमती न वाढवल्यास तेल कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होऊ शकतो. ३ ऑक्टोबरला आंतरराष्ट्रीय बाजारात असलेला कच्च्या तेलाचा ५५ डॉलर प्रती बॅरलाचा भाव आता ७० डॉलरच्या वर गेला आहे.

About Editor

Check Also

अर्थ मंत्रालयाची स्पष्टोक्ती, शुल्क आकारणीवर बाहेरील देशाचा दबाव नाही विरोधकांच्या आरोपावर वित्त मंत्रालयाची भूमिका

युपीआय (UPI) व्यवहारांवर ‘मर्चंट डिस्काउंट रेट’ (MDR) लागू करण्याचा निर्णय परदेशी दबावामुळे घेण्यात आला, या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *