बँकिंग, रिलायन्सच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी सेन्सेक्स ३३० अंकांनी वधारला

आठवड्यातील पहिला दिवस देशातील शेअर बाजारासाठी चांगला राहिला आहे. बँकिंग आणि ऊर्जा शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स, निफ्टी तेजीत राहिले. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ३३० अंकांच्या उसळीसह ६४,११२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १९४ अंकांच्या उसळीसह १९.१४० अंकांवर बंद झाला.

सोमवारी बँकिंग, आयटी, फार्मा, पीएसयू बँक इंडेक्स, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, इन्फ्रा, कमोडिटी, हेल्थकेअर, ऑइल आणि गॅसच्या शेअर्समध्ये खरेदी झाली. तर ग्राहकोपयोगी वस्तू, मीडिया, एफएमसीजी आणि वाहन क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्येही खरेदी दिसून आली. सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी १९ शेअर्स वाढीसह आणि ११ तोट्यासह बंद झाले. तर निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २७ वाढीसह आणि २३ शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आजच्या व्यापारात, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ३११.५६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. मागील ट्रेडिंग सत्रात सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ३१०.५४ लाख कोटी रुपये होते. म्हणजेच सोमवारी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत १.०२ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

उत्कृष्ट निकालामुळे रिलायन्सचा शेअर्स २.३० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. अल्ट्राटेक सिमेंट २.०६ टक्के, भारती एअरटेल १.३६ टक्के, इंडसइंड बँक १.१३ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.७९ टक्के, लार्सन ०.७९ टक्के, एचडीएफसी बँक ०.७१ टक्के, नेस्ले ०.५६ टक्के वाढीसह बंद झाले. टाटा मोटर्स १.७० टक्के, मारुती सुझुकी १.४५ टक्के, अॅक्सिस बँक १.१८ टक्के, एनटीपीसी १.०८ टक्क्यांनी घसरून बंद झाले.

About Editor

Check Also

सीईए व्ही अनंत नागेश्वरन यांचा सल्ला, पेट्रोल पुन्हा ई-१० वर आणा ई२० च्या पुढे जाण्यापूर्वी इंधनाचा ताळमेळ तपासावा

ई२० पेट्रोलवरून सुरू असलेल्या चर्चेच्या आणि जुन्या वाहनांच्या मालकांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, मुख्य आर्थिक सल्लागार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *