राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालयनिहाय आरोग्यसेवांची सर्वसमावेशक मानके निश्चित केली आहेत. ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा, सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत कोणत्या स्तरावर कोणत्या आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, तपासण्या, मनुष्यबळ, औषधे आणि पूरक सेवा उपलब्ध असाव्यात, याची स्पष्ट रूपरेषा निश्चित करण्यात आल्याची …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, आरोग्य विभागाचे प्रशिक्षण धोरण जाहीर प्रशिक्षण धोरणात आमुलाग्र बदलाने कौशल्यवृद्धीला चालना
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. आरोग्य सेवा देणाऱ्या मनुष्यबळाचे ज्ञान, कौशल्य आणि दृष्टिकोन अधिक सक्षम करणे हा प्रशिक्षण धोरणाचा केंद्रबिंदू आहे. या प्रशिक्षण प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल करण्यात आल्याने कौशल्यवृद्धीला चालना मिळणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित सर्पदंशावरील उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार
राज्यातील सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शासकीय, खासगी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि वैद्यकीय व्यवसायिकांना सर्पदंशाच्या प्रत्येक संशयित, संभाव्य किंवा निश्चित घटनेची आणि सर्पदंशामुळे झालेल्या मृत्यूची नोंद संबंधित आरोग्य प्राधिकरणाकडे करणे बंधनकारक …
Read More »महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या १४ नव्या सदस्यांची राज्य सरकारकडून घोषणा राज्य सरकारने निवडणूक रद्दबातल ठरवित भाजपा समर्थक सदस्यांची नियुक्ती
सरकारला अपेक्षित असलेले पॅनल निवडणून न आल्याने वैयकीय परिषदेची झालेली निवडणूकच रद्दबातल ठरविण्याचा पराक्रम सरकारने केला. आणि सरकारने यासंदर्भात नव्याने सदस्यांची नियुक्तीची घोषणा करेल असे राज्य सरकारच्या वतीने जाहिर करण्यात आले. त्यानुसार आज अखेर राज्य सरकारने त्यांना हव्या असलेल्या भाजपा समर्थक १४ सदस्यांच्या निवडीची घोषणा राज्य सरकारने केली. विशेष म्हणजे …
Read More »आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद
राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची येत्या काही दिवसांत नियुक्ती करण्यात येणार आहे. आणखी ६०० डॉक्टरांसाठी जाहिरात काढण्यात येत असून, सुमारे २५० दंतचिकित्सकही लवकरच आरोग्य सेवेसाठी उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक आरोग्य …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे आवाहन, गरीब, गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी कॉर्पस फंडातून मदत द्यावी रुबी हॉल क्लिनिक आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची बैठक
गरीब व गरजू रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी शासकीय योजनेतील निधीपेक्षा अधिक खर्च येत असल्यास तो कॉर्पस फंडातून उपलब्ध करून द्यावा. त्याद्वारे राज्यातील अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण मोहिमेला गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक …
Read More »प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, पदभरती, पदोन्नतीला गती द्या पदोन्नतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे आदेश
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित पदभरती आणि पदोन्नतीच्या प्रक्रियांना गती देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आरोग्य भवन येथे आयोजित बैठकीत आस्थापना विषयक विविध बाबींचा सविस्तर आढावा घेत त्यांनी विभागातील कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, एसएनसीयू व बालकांवरील उपचारांसाठी सर्वतोपरी उपाययोजना आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करणार
राज्यातील नवजात बालकांना वेळेवर, दर्जेदार आणि अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच एस एन सी यू मधील उपचार अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. एनआयसीयू व बालकांवरील उपचार या विषयावर आरोग्य भवन येथे आरोग्यमंत्री …
Read More »हसन मुश्रीफ यांची माहिती, आधुनिक सुविधा व दर्जेदार शिक्षणातून महाराष्ट्राला आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात अग्रस्थानी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या नूतनीकरण
शासकीय वैद्यकीय व दंत महाविद्यालयांत गुणवत्तेच्या जोरावर प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांप्रमाणे अत्याधुनिक सुविधा, जागतिक दर्जाचे शिक्षण आणि उत्कृष्ट प्रशिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. आधुनिक पायाभूत सुविधा, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राला आरोग्य व वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्याचा शासनाचा निर्धार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री …
Read More »प्रकाश आबिटकर यांची माहिती, ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद मिळणार ८० टक्के बांधकामे झालेल्या आरोग्य संस्था प्राधान्याने पूर्णत्वास नेण्याचा निर्णय ठरला मैलाचा दगड
राज्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ८० टक्क्यांहून अधिक बांधकामे पूर्ण झालेल्या आरोग्य संस्थाना युद्धपातळीवर कार्यान्वित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, तसेच बांधकाम पूर्णत्वास येत असतानाच आवश्यक वैद्यकीय यंत्रसामग्री, फर्निचर, मनुष्यबळ आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याच्या विभागाच्या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनी राज्यात प्रथमच मोठ्या संख्येने आरोग्य संस्थांचे लोकार्पण होत असल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रकाश …
Read More »
Marathi e-Batmya