मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले.

धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावरील डॉ. आबाजी थत्ते सेवा अनुसंधान संस्थेच्या वतीने हा वैद्यकीय प्रकल्प सुरू होत आहे. यावेळी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, महापौरनीता ठाकरे, माजी सरकार्यवाहक भैय्याजी जोशी, संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, उपाध्यक्ष अजय संचेती, सचिव शैलेश जोगळेकर, कोषाध्यक्ष आनंद औरंगाबादकर आदी उपस्थित होते.

नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट ही मध्य भारतातील सर्वात मोठी आणि अत्याधुनिक मल्टी स्पेशलिटी व सुपर स्पेशलिटी संस्था म्हणून सुरू होत असून २३ मजली सुसज्ज इमारत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये हेलिपॅडची सुविधा असून एअर ॲम्बुलन्ससुद्धा उपलब्ध होणार आहे. अत्याधुनिक उपचारांच्या सुविधांसोबतच अवयव प्रत्यारोपण व बर्न वॉर्ड राहणार असून ४६१ बेडची सुविधा तसेच रुग्णांच्या सुविधेसाठी अत्याधुनिक व जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी यावेळी सांगितले. अवयव प्रत्यारोपण सुविधेवर विशेष भर दिला जाणार आहे.

सिंगापूरच्या एस. के. या जागतिक दर्जाच्या वास्तू विशारद संस्थेतर्फे हा प्रकल्प तयार करण्यात आला आहे. येथे मेडिकल प्लॅनिंग आर्किटेकला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.

नॅशनल हेल्थकेअर इन्स्टिट्यूट सुमारे पाच लाख चौरस फूट क्षेत्रावर उभारले जाणार असून नागपूर परिसर तसेच मध्य भारतातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन या प्रकल्पाची संकल्पना करण्यात आली आहे. येथे मल्टीस्पेशालिटी तसेच सुपर स्पेशलिटी अंतर्गत जेरियाट्रिक रूमेट्रोलॉजी, हृदय व रक्तवाहिन्या, न्यूरोलॉजी, नेफ्रॉलॉजी, युरोलॉजी, क्रीडा वैद्यक प्लास्टिक व पुनर्रचना आदी सुविधा राहणार आहेत. या संस्थेमध्ये पदव्युत्तर व सुपर स्पेशलिटी अभ्यासक्रमासाठी पूर्ण सुसज्ज शैक्षणिक सुविधा असतील अशी माहिती संस्थेचे सचिव शैलेश जोगळेकर यांनी दिली.

स्वागत संस्थेचे अध्यक्ष अँड. सुनील मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर यांनी केले. कार्यक्रमास वैद्यकीय क्षेत्रातील तसेच विशेष निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मेघा दीक्षित यांनी केले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, इंडियन ऑइलच्या सीएसआरमधून जे. जे. रुग्णालयाला मिळणार अत्याधुनिक ब्रॉन्कोस्कोप प्रणाली मुख्यमंत्री यांच्या पुढाकारातून श्वसनविकारांच्या निदानाला मिळणार गती

राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांना अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *