Tag Archives: मोहन भागवत

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा इशारा, आंदोलनेच विभाजनांचे कारण बनतात सामाजिक दरी अधिक रुंद करण्याऐवजी समस्या सोडवण्यावर केंद्रीत असावीत

आंदोलने एखाद्या तक्रारीच्या मुद्द्यावर लोकांना एकत्र आणू शकतात, परंतु जेव्हा ती आंदोलनेच विभाजनाचे कारण बनतात, तेव्हा काय होते? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी नागपुरात विजयादशमी उत्सवानिमित्त केलेल्या भाषणात या प्रश्नावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, लोकशाहीत आंदोलने होणे अपरिहार्य आहे, परंतु ती सामाजिक दरी अधिक रुंद करण्याऐवजी …

Read More »

राहुल गांधी यांचा आरोप, मतचोरीतून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडून केलेले कायदे बेकायदेशीर निवडणूक प्रक्रियेतील अनियमततांचा संबध त्या कायद्याच्या वैधतेशी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांचा संबंध संसदेने केलेल्या कायद्यांच्या वैधतेशी जोडला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, मतांच्या चोरीतूनच कायद्यांची चोरी होते. आज मत गेले आहे आणि कायदा बनवण्याची व्यवस्थाही गेली …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा खुलासा, ‘गुंगी गुडिया’ हा अपशब्द, शिवी वा असंसदीय शब्द नाही सार्वजनिक जीवनात वावरताना टीका सकारात्मकतेने घ्यावी

काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ‘गुंगी गुडीया’ शब्द वापरला तो काही अपशब्द नाही, शिवी नाही, असंसदीय शब्द नाही. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले गेले होते पण त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून आपले कणखर नेतृत्व सिद्ध केल्याने अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना दुर्गा म्हटले. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या कर्तृत्वातून …

Read More »

मध्य भारतातील रुग्णांना मिळणार अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी व सुपर स्पेशलिटी सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज अशा ४६१ बेडची सुविधा असलेल्या नॅशनल हेल्थ केअर इन्स्टिट्यूट या मध्य भारतातील अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी आणि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले. धरमपेठ येथील नॉर्थ अंबाझरी मार्गावरील …

Read More »

राज ठाकरे यांचा मोहन भागवत यांना टोला, गुजरातमध्ये समरसतेचे धडे का नाही दिलेत? आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत ?

८ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भाषेबद्दल आग्रही राहणे, त्यासाठी वेळेस आंदोलन करणे हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं.  या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते ! परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व …

Read More »

आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले, तर जगभरातील हिंदू बांग्लादेशातील हिंदूना मदत करतील पुन्हा एकदा हिंदूत्वाचा नारा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांनी रविवारी संकटग्रस्त बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीवर एक स्पष्ट संदेश दिला. ते म्हणाले की, जर त्या देशातील हिंदू लोकसंख्येने आपल्या हक्कांसाठी उभे राहून लढण्याचा निर्णय घेतला, तर त्यांना जगभरातील हिंदूंचा पाठिंबा मिळेल. मुंबईत आरएसएसच्या व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी बोलताना मोहन भागवत म्हणाले, “बांग्लादेशात सुमारे १.२५ …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे मत, नागपूरात वैदिक गणित गुणवत्ता केंद्र सुरू व्हावे शासन सर्वतोपरी मदत करेलः वैदिक गणिताच्या खंडांचे प्रकाशन

भारतात विकसित झालेल्या विविध शास्त्रांचा पाया गणितावर आधारित आहे. वैदिक गणिताच्या खंडाद्वारे हे ज्ञान नव्याने समाजासमोर येणार आहे. वैदिक गणिताची महती व उपयोग येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे. त्याकरिता भारती कृष्ण विद्या विहार येथे वैदिक गणिताचे गुणवत्ता केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा व्यक्त करत यास शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी देशाला पुढे घेऊन जाणार माधव नेत्रालयाच्या प्रीमियम सेंटरचे भूमिपूजनः मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

संघटन, समर्पण आणि सेवेची त्रिवेणी भारत देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाचे सूत्र ठरणार असून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गोरगरिबांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविण्यासाठी केंद्र शासन कसोशीने कार्य करीत आहे. माधव नेत्रालयानेही या कार्यात योगदान देत गेल्या तीन …

Read More »

पंतप्रधान मोदी यांची रेशीमबागेतील आरएसएसच्या मुख्यालयास भेट डॉ हेडगेवार आणि गोळवळकर गुरूजींच्या स्मृतीस्थळाचे घेतले दर्शन

नागपूर येथील आरएसएस मुख्यालयाला भेट देणारे पंतप्रधान मोदी म्हणाले की, संघ हा भारताच्या अमर संस्कृती आणि आधुनिकीकरणाच्या वटवृक्षासारखा आहे. नागपूर दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिक्षाभूमीला भेट दिली. या भेटीदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय …

Read More »