बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक, हत्येची जबाबदारी बिष्णोईने घेतली? कायदा आणि सुव्यवस्थेवरून महाविकास आघाडीने केली टीका

वांद्र्यांचे माजी आमदार मंत्री बाबा सिद्धीकी यांच्यावर काल अज्ञात मारेकऱ्यांनी ९ एमएम पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांना तातडीने लीलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर बाबा सिद्धीकी यांचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी कूपर रूग्णालयात हलविले. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाबा सिद्धीकी यांचे सुपुत्र झिशान सिद्धीकी यांची भेट घेत सांत्वन केले.

दुपारनंतर बाबा सिद्धीकी यांच्यावर मरिन लाईन्स येथील बडा कबरास्तान येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघा जणांना पोलिसांनी काल रात्रीच अटक केली. आज त्या दोन आरोपींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर सुट्टीकालीन न्यायालयात पोलिसांकडून हजर करण्यात येणार आहे. या गोळीबाराच्या घटनेत एकूण चार जण असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पोलिसांनी काल रात्रीच एकाला पनवेल नजीक नाकाबंदीच्या दरम्यान अटक केल्याचे सांगण्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ला करण्यामागे कोण याचा शोध घेण्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. मात्र हा हल्ला बिष्णोई गँग कडून करण्यात आल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून सुरु झाली. त्यातच एका एसआरए प्रकल्पातील वादाच्या पार्श्वभूमीवरही ही हत्या करण्यात येत असल्याची चर्चाही सुरु झाली. दरम्यान पोलिसांकडून या दोन्ही अॅगलमधून तपास करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काही दिवसांपूर्वी बाबा सिद्धीकी यांना जीवे मारण्याची धमकी फोनवररून देण्यात आली होती. त्या अनुषंगाने बाबा सिद्धीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्थाही पुरविण्यात आली होती. तरीही संबधित गुन्हेगारांनी वांद्रे खेरवाडी येथील आमदार झिशान सिद्धीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्धीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सिद्धीकी यांच्यावर चार आरोपींनी गोळ्या झाडल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देत हे चौघेही बाईकवर आले होते असेही यावेळी सांगितले.

बाबा सिद्धीकी यांच्यावर चार ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

महाराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी बाबा सिद्धीकी यांच्यावर हल्ल्याप्रकरणी सुरक्षेप्रश्नी फक्त गृहमंत्र्यांची जबाबदारी नसून मुख्यमंत्री शिंदे यांचीही जबाबदारी आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी लक्ष्य देऊन हल्लेखोरांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी बाबा सिद्धीकी यांच्यावरील गोळीबाराच्या घटनेवरून राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सत्ताधारी पक्षाचे आमदारच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेची अवस्था काय असेल असे सांगत भाजपाला महाराष्ट्र युपी-बिहार करायचे होते. तसा महाराष्ट्र निर्माण केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करत मात्र आता आम्ही महाराष्ट्राचा बिहार युपी होऊ देणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपांपैकी एकजण उत्तर प्रदेशातील, एक पंजाबमधील आणि एकजण हरियाणातील असल्याची माहिती पोलिकांकडून पुढे आली आहे. यातील दोन आरोपी हे सप्टेंबर महिन्यापासून कुर्ला येथे भाड्याने रहात होते. तसेच बाबा सिद्धीकी यांच्या घराची कार्यालयाची रेकी केली होती असे सांगण्यात येत आहे. तसेच बाबा सिद्धीकी यांना मारण्याची सुपारी अटकेतील आरोपींना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आले आहे. हल्लेखोर आणि सुपारी देणाऱ्यांची भेट पंजाब-हरियाणा तील एका तुरुंगात झाल्याची चर्चा असून त्या भेटीतच ही सुपारी देण्यात आल्याचे सांगितले.

नेमके आज दुपारपारपासून बिष्णोई गँगच्या नावाने एक पोस्ट व्हायरल होत त्या पोस्टमध्ये अभिनेता सलमान खान आणि बाबा सिद्धीकी यांचे घनिष्ठ संबध आहेत. तसेच सलमान खान यांना बाबा सिद्धीकी यांनी मदत केली. याशिवाय डी कंपनीशी बाबा सिद्धीकी यांचा संबध होता. डी कंपनीशी संबधित लोकांचा हिशोब तर होणारच असे नमूद करत पुढे म्हणाले की, या पोस्टमध्ये असेही सांगण्यात आले की, अुज थापन याचा तुरुंगात झालेल्या मृत्यूचा बदला बाबा सिद्धीकी यांच्या हत्येने घेतला असल्याचा दावाही यावेळी केला.

About Editor

Check Also

वाशिममध्ये पेट्रोल पंपावरील लावलेल्या लाईनतील नंबरवरून नागरिकांमध्ये हाणामारी इंधन तुटवडा आणि शेकडो लोक एकाचवेळी पेट्रोल पंपावर जमा झाले

इंधनाच्या तुटवड्यामुळे डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी शेकडो लोक जमल्याने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *