भिवंडी पूर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून ऊर्जा मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण (MSEDCL)व त्यांच्या फ्रेंचाईजी क्षेत्रातील थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी गुरुवारी अभय योजना जाहीर केली. या योजनेचा लाभ राज्यातील ३६ लाख ग्राहकांना होणार आहे. यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, …
Read More »आमदार सतेज पाटील यांची टीका, मुश्रीफ आणि पाटील यांना कोल्हापूरची स्वाभिमानी जनता कधीही माफ करणार नाही गोकुळ दुध संघाच्या निवडणूक राजकारणावर भाजपा-राष्ट्रवादीच्या भूमिकेवरून टीका
महायुतीने सत्तेची दंडूकशाही वापरुन गोकुळवर मतदानाचा अधिकार असलेले चार अशासकीय सदस्य नेमण्याचा घेतलेला निर्णय हा लोकशाहीचा खून आहे. सत्तेच्या हव्यासापोटी सर्वसामान्य लोकांच्या भावना खुंटीला टांगून आपण किती टोकाचे निर्णय घेवू शकतो, याचा पुरावाच महायुती सरकारने दिला आहे. आज गोकुळमधील सत्तेबाबत जो निर्णय घेतला आहे तसाच निर्णय भविष्यकाळात गावागावातील ग्रामपंचायत, दुधसंस्था, …
Read More »वरुण बेव्हरेजेसची २,१०० कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार वर्धामधील आर्वी तालुक्यात उभारणार प्रकल्प
राज्यातील कृषी व अन्नप्रक्रिया, दुग्धजन्य पदार्थांवर प्रक्रिया उद्योगांना चालना देतानाच शेतकऱ्यांसाठी मूल्यवर्धनाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने वरुण बेव्हरेजेस लिमिटेड कंपनीने वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे २,१०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून अत्याधुनिक एकात्मिक उत्पादन प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रकल्पामुळे ५५० जणांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. मुख्यमंत्री …
Read More »पंतप्रधान मोदी यांचे शालेय मित्र असगर अली वोराची जमिन आमदार नरेंद्र मेहता यांनी परत केली मुख्यमंत्री फडणवीस यांचे सचिव श्रीकर परदेशी यांच्या बरोबरच्या बैठकीत जागा परत दिली
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शालेय मित्र असलेले ८१ वर्षीय असगर अली वोरा यांना, अनेक दशकांपासून सुरू असलेल्या मालमत्ता वादात पंतप्रधानांकडे हस्तक्षेप मागितल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर येथील त्यांची जमीन भाजप आमदाराकडून परत मिळाली. मंगळवारी, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जाहीर केले की ते वादग्रस्त भूखंडाचा ताबा सोडत आहेत आणि त्यासाठी मिळालेली …
Read More »बार्टी, सारथी, महाज्योतीप्रमाणे मार्टी संस्थेला निधी देण्याची आमदार रईस शेख यांची मागणी अल्पसंख्यांक समाजासाठीच्या मार्टी संस्थेच्या संचालक मंडळाची नियुक्ती
अल्पसंख्यांक समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘अल्पसंख्यांक संशोधन व प्रशिक्षण संस्थे’च्या (MRTI) नोंदणीला अखेर मुहूर्त मिळाला असून त्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. मार्टी संस्थेशी होत असलेला दुजाभाव संपुष्टात आणावा, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख …
Read More »आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण
बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित शैक्षणिक सहल रद्द करण्यात यावी आणि महापालिकेकडून होत असलेले शिक्षणाचे भगवीकरण थांबवावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार रईस शेख यांनी बृहन्मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना यासंदर्भात …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, १३८ जलदगती न्यायालयांसाठी न्यायाधीशांच्या उपलब्धतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठपुरावा आमदार राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली माहिती
राज्यात मंजूर करण्यात आलेल्या १३८ जलद गती न्यायालयांपैकी सध्या केवळ ५८ न्यायालये कार्यरत असून उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत शासनाकडून उच्च न्यायालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य डॉ. राहुल कुल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री …
Read More »आमदार रईस शेख यांची टीका, १०० दिवसांमध्ये मुंबई पालिकेवर रोख्याद्वारे पैसे उभे करण्याची वेळ काटकसरीसाठी सल्लागार न नेमण्याच्या सरकारच्या आदेशाला प्रशासनाचा हरताळ, रोखे आणि सल्लागाराचा निर्णय रद्द करण्याची मागणी
आशियातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर पहिल्या १०० दिवसांमध्येच रोख्याद्वारे पैसे उभारण्याची वेळ पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणली असून ‘काटकसरीसाठी सल्लागार नेमू नये’ या सरकारच्या आदेशाला पालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. या संदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई …
Read More »रईस शेख यांचा दावा, भिवंडीकरांसाठी मेट्रो मार्ग ५ च्या सुधारित आराखड्याला शासनाची मान्यता भिवंडीच्या जनतेला दिलेला शब्द पाळला
मुंबई मेट्रो मार्ग ५ च्या सुधारित आराखड्याला राज्य शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो प्रकल्पासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. विधिमंडळात आवाज उठवला आणि अखेर १८ हजार १३० कोटींच्या या महाप्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. भिवंडीच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी आमचा संघर्ष फळाला आला, अशी प्रतिक्रिया समाजवादी पक्षाचे भिवंडी …
Read More »आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय
पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पालघर जिल्ह्यासाठी पुढील २ वर्षांत एकूण २०० नवीन एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बोईसर विधानसभा …
Read More »
Marathi e-Batmya