बेस्ट संपाच्या कालावधीत खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस मान्यता

गृह विभागातर्फे अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी

बेस्ट संपाच्या कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना आज गृह विभागामार्फत जारी करण्यात करण्यात आली.

बेस्ट वाहतूक संघटनांनी त्यांच्या विविध मागण्यांकरीता काल ८ जानेवारीपासून संप पुकारला आहे. या पार्श्वभूमावर नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रस्तावित संपाच्या कालावधीत प्रवासी वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने उपाययोजना करण्यात आल्या असून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार आता बेस्ट संप कालावधीत मुंबई महानगर क्षेत्रात सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता देण्यात आली आहे. संप ज्यावेळी मागे घेतला जाईल त्यावेळी ही अधिसूचना रद्द समजण्यात यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

About Editor

Check Also

मुंबईतील ३९ बालगृहांतील ६०० हून अधिक भाऊ-बहिणी रक्षाबंधनानिमित्र एकत्र ‘टीम अवर चिल्ड्रन्स’चा अनोखा उपक्रम

मुंबई शहर आणि उपनगरातील विविध ३९ बालगृहांमध्ये राहणाऱ्या ६०० हून अधिक भाऊ-बहिणींना ‘टीम अवर चिल्ड्रन्स’ने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *