छोटा राजनच्या मेहुण्यासह एकाची पुराव्याअभावी सुटका व्यापारी संजय गुप्ता यांच्या हत्येप्रकरण : विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय

नवी मुंबईतील केबलच्या व्यापारी संजय गुप्तांच्या साल २००५ मधील हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने नुकतीच छोटा राजनचा मेहुणा जयंत मुळे आणि सध्या तुरुंगात असलेला टोळीतील कथित सदस्य संतोष भोसले यांची पुराव्याअभावी सुटका करण्याचे आदेश दिले.

दोघा आरोपीवरील आरोप सिद्ध करण्यासाठी सादर केलेले पुरावे पुरेसे नसल्याचे निरीक्षण विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी दोघांची सुटका करताना नोंदवले. गुप्ता यांच्या हत्येच्या संदर्भात कोणतेही वैद्यकीय पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. फिर्यादी पक्षाने चार साक्षीदार तपासले. परंतु, त्यांनी खटल्याच्या समर्थनार्थ कोणताही जबाब अथवा साक्ष दिली नाही आणि त्यामुळे अन्य आरोपी भोसलेही सुटण्यास पात्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले. गुप्ता यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे आणि कार्यालयात आलेल्या तीन आरोपींना योग्यरित्या पाहण्यात अपयशी ठरल्याचे गुप्ता यांच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या प्रमुख साक्षीदाराने न्यायालयात सांगितले. तथापि,मुख्य साक्षीदाराची साक्ष फिर्यादीच्या खटल्याला समर्थन देत नसल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. त्यामुळे रेकॉर्डवरील पुरावे लक्षात घेता प्रथमदर्शनी असे दिसून येते की, आरोपींचा या कथित घटनेशी वाजवी संशयापलीकडे संबंध जोडण्यात फिर्यादी पक्ष अयशस्वी ठरल्याचे निरीक्षणही न्यायालयाने आरोपींची सुटका करताना नोंदवले.

नवी मुंबईतील संजय गुप्ता या केबल व्यावसायिकाची २१ मार्च २००५ मध्ये राजनच्या टोळीतील सदस्यांनी त्याच्या नेरूळ कार्यालयात गोळ्या घालून हत्या केली होती. फिर्यादीनुसार, गुप्ता आणि प्रदीप मडगावकर यांच्यातील व्यावसायिक वैमनस्यातून ही हत्या झाली होती. छोटा राजनचा साथीदार बंड्या मामा जो हा व्यवसाय ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत होता. मृताने राजन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध केबल ऑपरेटर्सचा एक गट तयार केल्याने मडगावकर नाराज झाले होते. परिसरात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मडगावकर, छोटा राजन आणि त्याच्या गुन्हेगारी सिंडिकेटने गुप्ता यांची हत्या केल्याचा दावा गुप्तांचा पत्नीने केला होता.

About Editor

Check Also

बिल्डर सुशील रहेजा प्रकरण- वंचितच्या कार्यकर्त्यांची अटक; न्यायालयाने पोलिसांना फटकारले 'वंचित बहुजन आघाडी'च्या सर्व कार्यकर्त्यांची सुटका !

मुंबईत राहुल जाधव या तरुणाला जातीवाचक शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा आरोपी बिल्डर सुशील रहेजा विरोधात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *