मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबई आणि मुंबईकरांची उडाली दैना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाव्यातील मान्सूनने काढली हवा

मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर एकाच दिवसात मान्सूनचे पदार्पण महाराष्ट्रात झाले. पण मान्सूनच्या पावसाला मुंबईत पोहोचायला तीन दिवस लागणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. पण तत्पूर्वीच कोकणात आलेल्या पावसाने मुंबईत रात्रीत आगमन करत रात्रभर मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. त्यानंतर आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मान्सूनने चांगलीच हजेरी लावत कोसळायला सुरुवात केली. परंतु मुंबई शहरात दुपारी ११ वाजेपर्यंत चांगलाच पसरला. तर उपनगरात दुपार पर्यंत चांगलाच हजेरी लावली. परिणामी मुंबईकरांची जीवन वाहिनी असलेल्या उपनगरीय अर्थात लोकलसेवेवर चांगलाच परिणाम झाला.

सकाळी कामावर जायला निघालेल्या चाकरमान्यांवर पडलेल्या पावसामुळे लोकलच्या ट्रकमध्ये पावसामुळे जमा झालेल्या पाण्यामुळे रेल्वे सेवा रखडली. त्यामुळे सकाळी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर आलेल्या चाकरमान्यांना आल्या पावली परत घरी जाण्याची पाळी आली. त्यातच सेंट्रल रेल्वे मार्गावर लोकल गाड्या फार फार तर माटुंगा स्टेशन पर्यंत जात होत्या. त्यापुढील अनेक स्टेशनामध्ये पाणी साचल्याने लोकलसेवा पुढे जात नव्हती. त्यामुळे ज्या उपनगरीय रेल्वे गाड्या माटुंग्यापर्यंत पोहोचल्या त्या तिथेच अडकून पडल्या. त्यातच रस्ते मार्गावर हिंदमाता, परेल, भायखळा आदी भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. त्याचा परिणाम रस्ते वाहतूकीवरही झाला.

हिच परिस्थिती थोड्या फार फरकारने हार्बर मार्गावरील झाली होती. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल सेवेच्या अनेक गाड्या आहे त्या ठिकाणी थांबल्या होत्या. तर रस्ते महामार्गावरही धिम्या गतीने मार्गक्रमण करत होत्या. तर पश्चिम रेल्वे मार्गावरही रेल्वे सेवा काहीशा उशीराने धावत होत्या. तर अंधेरी स्टेशन सब-वे बोरीवली, कांदीवली सब-वे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे या मार्गावरील जवळपास वाहतूक ठप्प झाली होती. तर काही ठिकाणी पावसामुळे झाडे कोसळून पडल्याचे चित्र पाह्यला मिळत होते.

त्याचबरोबर मुंबईत नुकतीच सुरु झालेली भूमिगात मेट्रो स्टेशनमध्येही पावसाचे पाणी शिरल्याचे चित्र पाह्यला मिळाले. तर काही ठिकाणी मेट्रो मध्येच्या सदोष कामामुळे ड्रेनेज लाईन फुटल्याचे आणि त्याचे पाणी रस्त्यावरून नागरिकांच्या घरात शिरल्याचे पाह्यला मिळाले. तसेच अनेक खोलगट भागात मान्सूनच्या पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात तर मुंबईत केईएम हॉस्पीटलमध्येही पावसाचे पाणी शिरल्याने अनेक रूग्ण आणि त्याच्यासोबतच्या नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागला.

तसेच या पहिल्याच पावसाने सर्व टेलिफोन सेवांचे जाळे स्लो डाऊन झाल्याचे दिसून येत होते. तर काही काही टेलिफोन कंपन्यांचे नेटवर्क सेवाच गोंधळल्याचे दिसून येत होते.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसण्याचे पंप बसविण्यात आल्याने पाणी साचणार नाही, तसेच पावसाळ्यातही नागरिकांना सहज प्रवास करता येईल असा दावा विधानसभा निवडणूकीच्या दरम्यान केला होता. मात्र या दोघांनी केलेल्या दाव्यातील हवा मान्सूनच्या पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे चित्र पाह्यला मिळाले.

या सगळ्या पावसामुळे भारतीय हवामान खात्याने अधिकृतरित्या मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असल्याचे जाहिर केले.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, महापालिकेतील विकासनिधी वाटपात सत्ताधाऱ्यांची दादागिरी विरोधी पक्षातील काँग्रेसशी दुजाभाव पण समाजवादी पक्ष, MIM व राष्ट्रवादी काँग्रेसच्या (श.प.) नगरसेवकांना भरीव निधी, भाजपाचे या पक्षांशी काय हितसंबंध?

मुंबई महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यापासून विरोधी पक्षांच्या नगरसेवकांवर अन्याय केला जात आहे. विकासनिधी वाटप हे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *