मुंबई

वर्षा गायकवाड यांचा आरोप,… पण सरकार व रेल्वे प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत मुंबई लोकल प्रवास रामभरोसे, प्रवाशांवर हल्ले, खून, मारामाऱ्या, महिला अत्याचारांत वाढ

मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवास हा दिवसेंदिवस धोकादायक व चिंताजनक बनला आहे. लोकलमध्ये चाकू हल्ला, खून, मारमारी, महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झालेली दिसत आहे. लोकल प्रवास सुरक्षित राहिलेला नाही. आधीच लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळत प्रवास कारावा लागत असताना आता वाढलेल्या हिंसक घटनामुळे लोकल प्रवास रामभरोसे झाला आहे. रेल्वे पोलीस, रेल्वे व्यवस्थापन व राज्य सरकार कोणालाही प्रवाशांची …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते काळा घोडा …

Read More »

प्रताप सरनाईक यांची माहिती, एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ "झाडे लावा, झाडे जगवा ; पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी"

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्या विहार येथील विभागीय कार्यालयातून राज्यव्यापी वृक्षारोपण अभियानाचा शुभारंभ परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार दिलीप लांडे, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर यांच्यासह महामंडळाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरातील एसटीची …

Read More »

शिक्षिकेला त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा कामावर बहिष्कार टाकण्याचा शिक्षक भारतीचा इशारा

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात निवडणूकीशी संबधित एसआरएच्या शिक्षकांच्या कामाबाबतची लक्षवेधी विधान परिषदेत उपस्थित करण्यात आली होती. त्यावेळी त्यास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी उत्तर देत एसआय़आरच्या कामाचा शिक्षकांच्या अध्यापनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे उत्तर दिले होते. त्यास काही दिवसांचा अवधी लोटत नाही तोच एसआयआरच्या कामाच्या अतित्रासामुळे आणि या …

Read More »

मंत्रालयात पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई व नमुने तपासणी सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती

Mantralay

मंत्रालय मुख्य व विस्तार इमारतीमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची नियमितपणे साफसफाई करण्यात येते. यापूर्वी २६ एप्रिल २०२६ रोजीच मंत्रालयातील सर्व पाण्याच्या टाक्या साफ करण्यात आल्या होत्या. याबाबत तक्रारीची तात्काळ नोंद घेऊन साडेचार लाख लिटर क्षमतेच्या टाक्यांची पुनश्चः साफसफाई सुरु करण्यात आली असून दोन दिवसांत साफसफाई पूर्ण करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम …

Read More »

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते ‘१०० सर्वाधिक प्रभावशाली महिलांचा सन्मान’ महिला स्वयंसहायता गटांमुळे देशात क्रांती

महिला स्वयंसहायता गटांमुळे देशातील महिलांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय सक्षमीकरणाला गती लाभली असून ग्रामीण – आदिवासी महिलांच्या जीवनात क्रांतिकारक बदल झाले आहेत. गावोगावींच्या महिलांमध्ये नेतृत्वगुण विकसित होत आहेत. हे कार्य अधिक जोमाने होण्यासाठी समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज येथे केले. ‘फॉर्च्युन इंडिया’ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, १३ हजार कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा केंद्र शासनाला सादर मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधा, पुनर्विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि पूरनियंत्रणावर भर

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने पायाभूत सुविधा, पूरनियंत्रण, पुनर्विकास, आधुनिक तंत्रज्ञान, जलसुरक्षा, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा आणि पारदर्शक प्रशासन यांचा समन्वय साधणारे व्यापक नियोजन हाती घेतले आहे. या माध्यमातून मुंबईला भविष्यातील जागतिक दर्जाचे, सुरक्षित आणि सक्षम महानगर म्हणून विकसित करण्यात येत आहे. तसेच मुंबईतील पूरस्थितीवर …

Read More »

माधुरी मिसाळ यांची माहिती, मुंबईतील ५ हजार वृक्षांचा प्रायोगिक अभ्यास वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू

मुंबईतील वाढत्या वादळी वाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर वृक्षसंवर्धन आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून वृक्षांचे शास्त्रीय जोखीम मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्त्वावर बांद्रा (पश्चिम) परिसरातील ५ हजार वृक्षांचे मूल्यांकन करण्यात येत असून, त्याचा अहवाल सहा महिन्यांत प्राप्त होणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देताना दिली. विधानसभा सदस्य …

Read More »

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या विशेष फेरीस ८ जुलैपर्यंत मुदतवाढ शिक्षण विभागाचा निर्णय

राज्यातील काही भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी ८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा २४x७ ‘अलर्ट मोड’वर राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला आढावा

मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग ५० ते ७० किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. यासोबतच आज दुपारी ३ ते ४.३० वाजे दरम्यान समुद्राला भरती येण्याची शक्यताही आहे. या पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती आल्यास तातडीने मदत कार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »