मुंबई

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे! पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरु

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमिवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरु केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरूवारी …

Read More »

शंभूराज देसाई यांची माहिती, मुंबईतील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक अधिवेशात लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नावर निर्देश देताना दिली माहिती

मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या  पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्न व लक्षवेधींतील मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी संदर्भात मेघूदत या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत प्रभारी गृहनिर्माण …

Read More »

आमदार रईस शेख यांची मागणी, बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण पुनरुज्जीवित करा पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहित केली मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका पार्किंग शुल्कात ४० टक्के वाढ करण्याच्या तयारीत असताना समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र लिहून शुल्कवाढ करण्यापूर्वी विद्यमान पार्किंग धोरणाचा आढावा घेण्याची आणि बंद पडलेले मुंबई पार्किंग प्राधिकरण (एमपीए) पुनरुज्जीवित करण्याची विनंती केली. पार्किंगला महसूल मिळवण्याचे साधन मानण्याऐवजी वाहतूक शिस्त …

Read More »

महालक्ष्मी सरस २०२६ ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्यपदार्थ स्टॉल्स सहभागी, उत्पादनांची विक्रमी विक्री

महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, २ मे पासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात महिला बचतगटाच्या उत्पादनांची विक्रमी विक्री होत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर आणि परिचालन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी दिली. ५३५ उत्पादक स्टॉल्स आणि ८० खाद्य स्टॉल्सचे आकर्षण ग्रामविकास व …

Read More »

इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-१ चे वेळापत्रक जाहीर ८ मे पर्यंत सात लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांची नोंदणी

राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नियमित कॅप फेरी-1 चे वेळापत्रक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. ८ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-1 आणि भाग-२ भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, ८ मे २०२६ …

Read More »

आशिष गुप्ता यांचे मत, मोठ्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीत संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम आवश्यक सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य

शासन अथवा खासगी कोणताही नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविताना सायबर सुरक्षा, डेटा एन्क्रिप्शन आणि गोपनीयतेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक असून नाविन्यपूर्ण प्रकल्पावर काम करणा-या टीममध्ये संघभावना, संयम आणि सातत्यपूर्ण काम करणे आवश्यक असल्याचे मत निवृत्त आयपीएस अधिकारी आशिष गुप्ता यांनी व्यक्त केले. मंत्रालयातील परिषद सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘टेक वारी २.०’ उपक्रमांतर्गत ‘इम्प्लिमेंटेशन ऑफ लार्ज आयटी …

Read More »

राज्यातील १० वीचे ९२.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, कोकणचा निकाल सर्वाधिक ९७.६२ % शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्याकडून दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन

दहावीच्या निकालाचा क्षण हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेचा निकाल मंडळामार्फत जाहीर करण्यात आला असून यशस्वी विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केले. या परीक्षेत ज्यांना अपेक्षित यश मिळाले …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेच्या मे.हायके एएस यांच्यात सामंजस्य करार

मुंबई महानगर प्रदेशातील वाढत्या वाहतूक गरजांसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक जलवाहतूक व्यवस्था उभारण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पामुळे देशात आधुनिक जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित मे. हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनीदरम्यान …

Read More »

नितेश राणे यांची सूचना, एमएमआरमधील जलवाहतुकीसाठी ऑनलाईन तिकीट कार्यान्वित करा मुंबई महानगर प्रदेशातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जलवाहतुकीमध्ये डिजिटल प्रणाली

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवासी जलवाहतुकीसाठी आधुनिक आणि एकात्मिक ऑनलाईन तिकीट वितरण व विक्री प्रणाली लवकरात लवकर कार्यान्वित करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. जलवाहतूक सेवा अधिक पारदर्शक, सुलभ आणि प्रवासी-केंद्रित करण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे …

Read More »

नितेश राणे यांची माहिती, पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ उभारणार मंत्रालयातील बैठकीनंतर दिली माहिती

पनवेल येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रस्तावित ‘स्कायला अॅक्वेरियम व सी लायन मनोरंजन केंद्र’ प्रकल्प उभारण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. या प्रकल्पासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर निवेदन सादर केले. ‘स्कायला …

Read More »