लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा केवळ घटनात्मक अधिकार नाही, तर भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. परंतु भाजपा सरकार निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदार याद्यांमध्येही घोटाळा करत आहे. विविध राज्यात राबवण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेतून मोठ्या संख्येने मतदार वगळण्यात आलेले आहेत. अशी परिस्थिती मुंबईकरांवर ओढवू नये, यासाठी एसआयआर प्रक्रियेवर बारीक नजर ठेवावी व एकाही मुंबईकराचे नाव …
Read More »डोंबिवलीतील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून जमीन देण्यास मंजुरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील मौजे सागांव-सोनारपाडा येथील पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टला अतिक्रमण नियमानुकुल करून चार एकर पंचवीस गुंठे जमीन देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मौजे सागांव-सोनारपाडा येथील श्री पिंपळेश्वर देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वापरात असलेली जागा संस्थेला सामाजिक कार्यासाठी नाममात्र देण्याची …
Read More »आमदार रईस शेख यांची टीका, १०० दिवसांमध्ये मुंबई पालिकेवर रोख्याद्वारे पैसे उभे करण्याची वेळ काटकसरीसाठी सल्लागार न नेमण्याच्या सरकारच्या आदेशाला प्रशासनाचा हरताळ, रोखे आणि सल्लागाराचा निर्णय रद्द करण्याची मागणी
आशियातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेवर पहिल्या १०० दिवसांमध्येच रोख्याद्वारे पैसे उभारण्याची वेळ पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी आणली असून ‘काटकसरीसाठी सल्लागार नेमू नये’ या सरकारच्या आदेशाला पालिका प्रशासनाने हरताळ फासला आहे, अशी टीका समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली. या संदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, मुंबई …
Read More »प्रताप सरनाईक यांची माहिती, १५ ऑगस्टपर्यंत रिक्षा-टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठी शिकणे सक्तीचे चालकांसाठी चार हजार शिक्षकांची नियुक्ती
राज्यातील प्रवाशांसोबत रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीत संवाद साधता यावा, यासाठी त्यांना मराठी भाषा शिकविण्याची राज्य शासनाची भूमिका असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांनी १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष प्रशिक्षण केंद्रांमध्ये शिकणे सक्तीचे असून, १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. तसेच नियमांचे पालन न करणाऱ्यांवर …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर; मुंबई टेक वीक अधिक भव्य ओपन ए आय,मेटा, एंथ्रॉपिक आणि क्लाउडगुगल यांसारख्या जागतिक अग्रगण्य ए आय कंपन्यांचा सहभाग
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे भविष्यातील परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात AI स्वीकारण्याची आवश्यकता आहे. मुंबई टेक वीकसारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचे अग्रगण्य केंद्र बनेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई टेक वीक (MTW) २०२६ ची घोषणा सह्याद्री अतिथिगृहात केलीत्यावेळी ते बोलत होते. …
Read More »पोदार रुग्णालयातील आय.सी.यु. सुविधेबाबत आयोगाच्या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली 'मानवी हक्क आयोग केवळ कागदी वाघ आहे का?' : वरळीत संतप्त सवाल
वरळीतील पोदार रुग्णालयात तातडीने अद्ययावत ‘आय.सी.यु.’ विभाग सुरू करण्याच्या राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाला दीड वर्ष उलटूनही प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. या दिरंगाईविरोधात आणि आयोगाच्या आदेशांच्या निष्प्रभ अंमलबजावणीविरोधात ‘शांती वैभव बुद्ध विहार’ व ‘नवतरुण क्रीडा मंडळ’ या संस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून, मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षांना परखड पत्र लिहून …
Read More »नितेश राणे यांची माहिती, जलवाहतूक सेवा होणार डिजिटल ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार
मुंबई महानगर प्रदेशातील जलवाहतूक सेवा अधिक आधुनिक, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल करण्यासाठी ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वर्सोवा-मढ पारंपरिक तिकीट प्रणाली आधुनिक डिजिटल प्रणालीमध्ये रूपांतरित करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मुंबई महानगर प्रदेश मधील प्रवासी जलवाहतूकीसाठी ऑनलाईन तिकीट वितरण, विक्री प्रणाली सुरु करणेबाबत आढावा बैठक …
Read More »महाराष्ट्रात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो-महाआयटी करार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंज्यस करार
राज्यातील डिजिटल जनजागृती, डिजिटल समावेशन आणि सुरक्षित मोबिलिटी परिसंस्था मजबूत करण्यासाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड (महाआयटी) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या कराराच्या वेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती …
Read More »बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क शासनामार्फत भरण्यास विशेष मान्यता शासन निर्णय जारी करत दिली मान्यता
बदलापूर येथे ऑगस्ट २०२४ मध्ये एका शाळेत अनुचित घटना घडली होती. त्या घटनेनंतर त्यातील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी त्यांच्या इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा प्रवेश शुल्काचा संपूर्ण खर्च शासनामार्फत अदा करण्यास, एक वेळची विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. …
Read More »वाशिममध्ये पेट्रोल पंपावरील लावलेल्या लाईनतील नंबरवरून नागरिकांमध्ये हाणामारी इंधन तुटवडा आणि शेकडो लोक एकाचवेळी पेट्रोल पंपावर जमा झाले
इंधनाच्या तुटवड्यामुळे डिझेल आणि पेट्रोल खरेदी करण्यासाठी शेकडो लोक जमल्याने महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील एका पेट्रोल पंपावर लाईनतील नंबरवरून गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये हिंसक संघर्ष झाला. वाशिम येथील इंडियन ऑइलचे डीलर जितेंद्र चोप्रा यांनी सांगितले की, शनिवारी दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास १५,००० लिटर डिझेल आणि ५,००० लिटर पेट्रोल घेऊन …
Read More »
Marathi e-Batmya