शंभूराज देसाई यांची माहिती, मुंबईतील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक अधिवेशात लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्नावर निर्देश देताना दिली माहिती

मुंबई शहरातील ‘म्हाडा’च्या ३८८ इमारतींच्या  पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या कामाला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने गतीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या प्रश्न व लक्षवेधींतील मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणी संदर्भात मेघूदत या शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई बोलत होते.

बैठकीत आमदार मनोज जामसुतकर, आमदार रईस शेख, आमदार मनीषा चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद शंभरकर व म्हाडा इमारत पुनर्विकासातील रहिवासी उपस्थित होते.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याशी चर्चा करून म्हाडाच्या इमारतीच्या पुनर्विकासाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. म्हाडाच्या पुनर्विकासाबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल. नगर विकास विभागाला याबाबत सविस्तर सूचना देण्यात येतील असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

गुलाबराव पाटील यांचे आदेश, न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीने समन्वयातून तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या न्हावा-शेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतीपथावर असून, कोन ते पळस्पे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *