वर्षा गायकवाड यांची मागणी, मुंबईतील कोळीवाडा आणि गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्या मुंबईचा प्रश्न लोकसभेत केला उपस्थित

मुंबईचे मूळ रहिवाशी कोळी बांधवांच्या कोळीवाडे आणि गावठाणांच्या सीमांकनाचा प्रश्न गंभीर असून खार दांडा येथील इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न प्रलंबित आहे. ज्यांना घरे बांधायची आहेत, त्यांना तातडीने परवानगी मिळाली पाहिजे. मुंबईतील कोळीवाडा आणि गावठाण सीमांकनाचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.

खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी आज लोकसभेत झिरो अवरच्या माध्यमातून कोळीवाडा आणि गावठाणांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्या पुढे म्हणाल्या की, खार दांडा येथील इमारतींची दुरवस्था झाली असून त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आणि नवीन बांधकामासाठी परवानगी मिळणे हा स्थानिक नागरिकांचा अधिकार आहे. मुंबई विकास नियमावलीमध्ये गावठाणासंदर्भातील निर्णय घेतला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेचे नियम त्यांना लागू होत नसल्याने त्यांना परवानगी मिळत नाही. याचा गैरफायदा काही असमाजिक तत्व घेतात. मूळ मुंबईकरांच्या हक्काच्या घराबाबत सरकारने निर्णय लवकर घ्यावा अशी आग्रही मागणी यावेळी केली.

मुंबईतील उपनगरीय रेल्वेच्या सुविधा वाढवा..

खासदार वर्षा गायकवाड यांनी लोकसभेत मुंबई उपनगरीय रेल्वेचा प्रश्न उपस्थित केला, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुविधांचा मोठा प्रश्न असून लोकलमधून दररोज लाखो प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, दररोज ४-५ लोक लोकलमधून पडून मृत्यू होतात. ठाणे, कल्याण, विरार आणि पनवेलशी जोडणाऱ्या प्रमुख मार्गांवर गर्दीच्या वेळी जाणवणाऱ्या गर्दीचे मूल्यमापन करून गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. मुंबईतील प्रस्तावित उपनगरीय सेवांच्या विस्तार करून, सिग्नल यंत्रणेतील सुधारणा, फलाटांची क्षमता वाढवणे यासारख्या पायाभूत सुधारणा करण्यासाठी सरकार काय करत आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तरात म्हटले की, मुंबई उपनगरीय क्षेत्रातील रेल्वे जाळ्याची क्षमता वाढवण्यासाठी, ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP)-II’ (₹८,०८७ कोटी), ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP)-III’ (₹१०,९४७ कोटी) आणि ‘मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (MUTP)-III A’ (₹३३,६९० कोटी) या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबई उपनगरीय क्षेत्रात विविध विकासांची व पायाभूत सुविधांवर भर देण्यात येत असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीसांना पीएपीच्या सदनिकांसाठी का होईना हाऊसिंग स्टॉकचा पर्याय 'हाउसिंग स्टॉक' मधील घरांच्या प्रभावी उपयोगासाठी धोरण तयार करण्याचे दिले आदेश

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आगामी काळातील हाऊसिंग स्टॉकचा प्रश्न भेडसावू शकतो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *