देवेंद्र फडणवीस म्हणाले अजित पवारांना, आम्ही तुमच्याकडूनच शिकलो… निधी वाटप आणि कामाच्या स्थगितीवरून अजित पवारांच्या प्रश्नाला उत्तर

विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निधी वाटपाला आणि सुरु झालेल्या कामांना स्थगिती शिंदे-फडणवीस सरकारने दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्यापेक्षा जास्तवेळा निवडूण आलात. आम्ही तुमच्यापेक्षा कमी वेळा निवडूण आलोय. पण आम्ही जे काही शिकलोय ते तुमच्यामुळेच असे सांगत अजित पवार यांना निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर चर्चेची मागणी केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, जरी तुम्ही आमच्यावर अन्याय केला असला तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. स्थगिती दिलेल्यापैकी ७० टक्के कामांना पुन्हा मान्यता देत ती कामे सुरु करण्यात आली आहेत. फक्त ३० कामांचा सध्या प्रश्न आहे. त्यासही जो निधी मंजूर करण्यात आला आहे. त्या निधीचा प्रश्न आहे. आमदनी आठन्नी खर्चा रूपया अशा प्रकरातून हे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्या कामांबाबत स्थगिती देण्यात आलेली असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र आम्ही ज्या कामांना २ हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यास ४ हजार आणि ६ हजार कोटी असा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे उर्वरित कामांचा निधीची व्यवस्था झाल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात ठाकरे सरकार असताना तुम्ही अर्थमंत्री होतात. त्यामुळे तुम्ही अनेक जणांचा निधी रोखला. इतकेच काय तुम्ही माझ्या मतदारसंघातील कामाचा निधीही रोखलात. तरीही आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही. आम्ही जे काही शिकलो ते तुमच्याकडूनच शिकल्याचा टोलाही फडणवीस यांनी अजित पवार यांना लगावला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, मेट्रो मार्गांच्या माध्यमातून शहरी भागांमध्ये सुरक्षित, जलद सार्वजनिक वाहतुकीस मोठी चालना २०३० पर्यंत ३०० किमीहून अधिक नवीन मार्ग सुरू करण्याचे नियोजन

राज्यातील मेट्रो प्रकल्पांची कामे वेगाने सुरू असून मुंबई, पुणे, नागपूर तसेच मुंबई महानगर प्रदेश एमएमआरडीए च्या शहरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *