राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे नेमके काय बोलतील आणि नेमका कोणावर निशाणा ठेवून कोणंत व्यक्त करतील याविषयीचा अंदाज बांधण कठीण. पण त्यांच्या बोलण्यात एक स्पष्टता असल्याने त्यांचे कितीही चुकीचे किंवा अडचणीच्या वेळी केलेल्या वक्तव्यामुळे कितीही गंभीर वातावरण लगेच हलकं होऊन जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांबरोबरच राजकिय व्यक्तींनाही त्याचा अनुभव आहे. नेमका असाच एक अनुभव बारामतीत एका बैठकीत काही जणांना आला.
एका रस्त्याच्या कामाच्या निमित्ताने आयोजित बैठकीत अजित पवार म्हणाले की, काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं. त्याशिवाय पुढे काही चालत नाही असे वक्तव्य केले. त्यावरून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
लगेच पुढे अजित पवार म्हणाले की, काक कुतवळ यांना मी रस्त्याबाबत सांगितलं आहे. त्यांना म्हणालो की, सहकार्य करा. याशिवाय मी तहसीलदार, बीडीओ आणि स्थानिक निरिक्षकांनाही लेखी आदेश दिले, मी म्हटलं काकालाही विश्वासात घ्या. काका लोकांनाही विश्वासात घ्यावं लागते. त्याशिवाय पुढे काही चालत नाही. काका म्हणजे काक कुतवळ यांना…नाहीतर माध्यमं लगेच चर्चा करतील, अजित दादा घसरले, कोणावर घसरले याचीही चर्चा होईल असे सांगायलाही विसरले नाहीत.
साधारणतः दोन अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडीत असतानाही भाजपासोबत जाण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यात मतमतांतरे असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार पडल्यांतर राष्ट्रावादी काँग्रेस मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंड करत अजित पवार यांनी वेगळा मार्ग निवडला. त्यानंतर पक्षावरही दावा सांगितला. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. तसेच मध्यंतरी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आणि विधानसभा निवडणूकीत शरद पवार यांच्यावर अजित पवार यांनी टीकाही केली. मात्र विधानसभा निवडणूकीत शरद पवार यांच्यावर कोणतीही टीका केली नाही. मात्र काकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय काही चालत नाही असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. मात्र काका कुतवळ यांच नाव घेतल्याने त्या वाक्यामागील कुतहूल काही काळ कमी झाल्याचे दिसून आले.
काही दिवसापूर्वी अजित पवार हे बीडच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अजित पवार यांनी त्यांचे चुलते-काक शरद पवार यांचे नाव घेत कार्यकर्त्यांना सल्ला देताना म्हणाले की, बोलताना भान बाळगा, पुढाऱ्यांच्या पाया पडायचं असेल तर त्यांचा इतिहास आठवा, तसेच माझ्या पाया पडायला येऊ नका, हार टोप्या, मानचिन्ह काही देऊ नका चुलत्याच्या कृपेने आमचं बरं चालंल आहे असं सांगायलाही विसरले नाहीत.
Marathi e-Batmya