परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी आशिष दामले तर कृषी शिक्षण व संशोधन परिषदेवर तुषार पवार व बापू भेगडे प्रदेशाध्यक्ष सुनिलजी तटकरे यांनी केले अभिनंदन...

परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष दामले तर महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदी तुषार पवार व बापू भेगडे यांची निवड करण्यात आली असून या पदाधिकाऱ्यांचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना ३ ऑक्टोबर २०२४ रोजी शासन निर्णय (नियोजन विभाग) कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ८ मधील तरतुदीनुसार करण्यात आली होती. यानुसार आज आशिष दामले यांची निवड करण्यात आली तर तुषार पवार आणि बापू भेगडे यांची महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम १९८३ मधील कलम १२ (२)(ब)मधील तरतुदीनुसार संदर्भ क्र. १ अन्वये ही निवड करण्यात आली आहे. दरम्यान महामंडळावर निवड झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अभिनंदन केले आहे.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *