गुजरात मॉडेल खोटा असल्यानेच भिंत बांधण्याची मोदी सरकारवर पाळी जाहीर निषेध करत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अहमदाबाद भेटीवेळी तिथली गरिबी ट्रम्प यांना दिसू नये म्हणून मोठी भिंत बांधून गरिबी लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न मोदी सरकारकडून केला जात आहे. गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून ढोल पिटणाऱ्या मोदींनीच गरीबी दिसू नये यासाठी केलेले मोदी सरकारचे हे कृत्य अमानवी असून काँग्रेस त्याचा जाहीर निषेध करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले.
गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून ११ वर्षात आपण देशातील इतर कोणत्याही राज्यापेक्षा जास्त विकास केल्याचा ढोल याच नरेंद्र मोदी यांनी पिटले होते. पण त्यांचा गुजरात मॉडेल सपशेल खोटा आहे. सत्तेत असताना काही विकास केला असता तर अहमदाबादमधील गरिबांची ही वस्ती दिसली नसती. पण गरिबांसाठी काही केलेच नाही म्हणून तर लपवाछपवी करावी लागत असल्याची टीका त्यांनी केली.
अहमदाबादमधील गरिबांच्या झोपड्या ट्रम्प यांना दिसू नये यासाठी चालवलेला खटाटोप अत्यंत निंदनीय व लाजीरवाणा आहे. अमेरिकेतही गरिबी आहेच, मग भारतातील गरिबीचे दर्शन ट्रम्प यांना झाले तर असा कोणता डोंगर कोसळणार आहे. परंतु आपण विकास पुरुष असल्याचा आव आणून बकाल शहर व गरिबी हटवण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी केलेला हा घृणास्पद प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
नरेंद्र मोदी हे स्वतः गरिबीतून पुढे आल्याचे अनेकदा सांगत असतात मग आता त्यांना गरिबीची एवढी लाज का वाटावी ?
डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदाच अहमदाबामध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. हाच पैसा या गरिबांसाठी वापरला असता तर अशी भिंत बांधून लपवाछपवी करण्याची वेळ मोदींवर आली नसती पण त्यांना गरिबांविषयी कणव असण्याचे कारण नाही. गरिबांच्या कल्याणासाठी काही केले असते तर गरिब श्रीमंतामधील भिंत आपसूकच गळून पडली असती. लोकसभा निवडणुकीवेळीही नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील कचऱ्याचे ढीग दिसू नयेत म्हणून मोठं-मोठे होर्डींग लावल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

About Editor

Check Also

एमपीएससी कडून दोन दिवसांनंतरही कोणताही प्रतिसाद नाही CBT व Normalization रद्द होईपर्यंत काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण व ठिय्या आंदोलन सुरूच

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अर्थात एमपीएससीने स्पर्धा परीक्षा सीबीटी CBT (Computer Based Test) पद्धतीने घेण्याचा तसेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *