भाजपाच्या माघारीने दौंड विधान परिषदेवर बिनविरोध राजन तेलींनी घेतला उमेदवारी अर्ज मागे

मुंबईः प्रतिनिधी
विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विजयामुळे रिक्त झालेल्या जागेवर राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दौंड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधात भाजपाचे राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आज शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतल्याने दौंड यांची निवड बिनविरोध झाली.
राजन तेली यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने भाजप आणि महाविकास आघाडीची थेट पहिली लढत होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र महाविकास आघाडीकडील मतांची संख्या भाजपाच्या सदस्यांपेक्षा जास्त असल्याने निवडणूकीच्या निमित्ताने भाजपाचा पुन्हा पराभव दिसायला नको म्हणून राजन तेली यांना ऐनवेळी माघार घेण्यास सांगण्यात आल्याचे भाजपामधील सूत्रांनी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, महाराष्ट्रातील एअर ॲम्ब्युलन्स आणि नवीन ॲम्ब्युलन्स सेवेसाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित होणार परिवहन विभागाच्या पुढाकाराने सात सदस्यीय समिती गठित

महाराष्ट्र राज्यातील एअर ॲम्ब्युलन्स व नवीन ॲम्ब्युलन्स सेवांचे संचालन अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी करण्याच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *