चंद्रकांत दादा, तुमच्यासोबत शिवसेना राहिल का ते बघा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पलटवार

 मुंबई : प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे त्याची चिंता तुम्ही करु नका आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना रहातो का ते आधी बघा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले.

भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाला वेगवेगळे लढण्याचे आव्हान दिले त्या वक्तव्याचा समाचार घेताना चंद्रकांतदादा पाटील यांना आधी स्वत:चं बघा असा टोलाही त्यांनी लगावला.

चंद्रकांतदादा पाटील आम्हाला आव्हान देत आहेत की,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यामध्ये हिम्मत असेल तर वेगवेगळी निवडणूक लढवून दाखवा. परंतु आमची आघाडी निश्चित आहे. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी देशात व महाराष्ट्रामध्ये ठरलेली आहे आणि आम्ही एकत्रितच निवडणूका लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 तुमचे सहकारी पक्ष तुमच्यासोबत निवडणूका लढवू इच्छित नाहीत किंवा यायला तयार नाही. त्या भीतीपोटी तुम्ही दुसऱ्या पक्षांना आव्हान देण्याचे काम करत आहात. आधी शिवसेना तुमच्यासोबत राहिल का याची चिंता तुम्ही करा. आम्ही एकसंघ राहणार आहोत. तुम्ही अशी कितीही आव्हाने दिलीत तरी ती आम्ही स्वीकारणार नाही. आमच्यासमोर फक्त एकच आव्हान आहे ते म्हणजे या देशातून…राज्यातून भाजपला हद्दपार करणे आणि ते आम्ही करुन दाखवणार असा जबरदस्त आत्मविश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

About Editor

Check Also

‘एनटीए’ परीक्षा आयोजनाच्या दृष्टीने उच्चस्तरीय समितीची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा ‘एनटीए’च्या परीक्षा आयोजनात राज्य शासनाचा सहभाग वाढविण्यावर भर

राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए) आयोजित विविध राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांचे आयोजन अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि सुरळीत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *