चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, कोल्हापूरच्या हेरे सरंजाम इनाम जमिनींचा प्रश्न निकाली भोगवटादार वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर; रूपांतर मूल्य पूर्णपणे माफ

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील हेरे गावातील सरंजाम इनाम जमिनींचा तब्बल ५५ वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्य शासनाने विशेष बाब म्हणून निकाली काढला असून, भोगवटादार वर्ग २ च्या जमिनींचे कोणतेही रूपांतर मूल्य न आकारता भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यास मान्यता देण्यात आली असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, हेरे सरंजाम इनामातील सुमारे ११ हजार ३९४ हेक्टर जमिनी फ्री होल्ड करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मात्र, १९५१ मधील मूळ फेरफार, गाव नमुने, सातबारा उतारे आणि अन्य आवश्यक अभिलेख उपलब्ध नसल्याने भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतर करण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना अनेक वर्षे शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत होते.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, या जमिनी भोगवटादार वर्ग २ मध्ये असल्यामुळे शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यात तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात अडथळे येत होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने विशेष बाब म्हणून निर्णय घेत कोणतेही रूपांतर मूल्य किंवा नजराणा वसूल न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आकारण्यात येणारी सुमारे ५४,११,०४१ रुपयांची रक्कमही माफ करण्यात आली असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जमिनींच्या अभिलेखांबाबत भविष्यात कोणताही वाद निर्माण झाल्यास तो सोडविण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यास मान्यता देण्यात आले असल्याचेही सांगितले.

About Editor

Check Also

हरिष चौधरी यांची स्पष्टोक्ती, जातनिहाय जनगणनेसाठी तेलंगणा पॅटर्नचा वापर करा जनगणनेत OBC प्रवर्ग कॉलमचा स्पष्ट उल्लेख असावा

जातनिहाय जनगणना ही सर्व जातींच्या हितासाठी आहे. जातींचा डेटा स्पष्ट झाला तरच प्रत्येक वर्गाला न्याय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *