सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटने करत भावनाशून्यतेचे प्रदर्शन तंबाखू विरोधी प्रदर्शनाला भेट देत इलेक्ट्रीक वाहनांचे उद्गाटन केले

मुंबई : प्रतिनिधी

राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग उर्फ भाऊसाहेब फुंडकर यांच्या निधनाला काही तासांचा अवधी लोटत नाहीत तोच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या राज्यात दुखवटा जाहीर करण्याऐवजी मंत्रालयाच्या दालनात उद्घाटने आणि प्रदर्शनांना भेटी देत आपल्या भावना शुन्यतेचे जाहीर प्रदर्शन केले. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातील सहकारी मंत्र्याचे निधन होवूनही मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या भावना शुन्यतेची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकाळच्या सत्रातील नियोजित कार्यक्रमात मंत्रालयाच्या आवारात भरविण्यात आलेल्या व्यसनमुक्तीच्या प्रदर्शनाला भेट देणे आणि इलेक्ट्रीक वाहनांचा वापर शासकीयस्तरावर करण्याचे उद्घाटन करण्याचे दोन कार्यक्रम होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांचे आज गुरूवार पहाटे ४.३५ ला निधन झाले. मंत्रिमंडळातीलच एका सहकाऱ्याचे निधन झाले म्हणून जाहीर सर्व कार्यक्रम मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी रद्द करणे अपेक्षित होते.

परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारच्या भावनाशुन्यतेचे प्रदर्शन करत सहकारी मंत्र्यांच्या निधनाचे कोणतेही दु:ख दाखविले नाही. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेल्या आणि भाजप पक्षवाढीसाठी उभी हयात घालविणाऱ्या एका ज्येष्ठ नेत्याचे निधन झालेले असताना इतका कोडेगपणा आणि भावनाशुन्यतेचे प्रदर्शन यापूर्वी कधीच कोणत्याही सरकारने दाखविले नसल्याची चर्चा राजकिय क्षेत्रात सुरु आहे.

About Editor

Check Also

अनुसूचित जाती आरक्षणातील उपवर्गीकरण विरोधात विधान भवनावर मोर्चा २७ आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 'बदर समिती'चा अहवाल रद्द करण्याची मागणी

अनुसूचित जाती (एससी) आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *