मुख्यमंत्री फडणवीस यांची वक्फ विधेयकावरून उद्धव ठाकरे यांना डिवचले बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार

मागील काही दिवसांपासून शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत आणि प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातील मनोमिलनाच्या चर्चा रंगलेल्या असतानाच भाजपाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदेत उद्या मांडण्यात येणाऱ्या वक्फ विधेयकावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना डिवचले. तसेच संसदेत मांडण्यात येणाऱ्या वक्फ बिलावर उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार असा थेट सवाल शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना एका ट्विटच्या माध्यमातून केला.

भाजपाच्या प्रयत्नाने शिवसेना पक्षात फूट पडली. त्यातून एक गट निष्ठावंताचा जो उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिला तर शिवसेनेचे अनेक आमदार आणि खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत शिवसेना उबाठापेक्षा जास्त आमदार आणि खासदार निवडूण आले. त्यामुळे शिवसेना पक्षातून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे हे सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाचविण्यासाठी आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हे चिन्ह वाचविण्यासाठी उठाव केल्याचे सांगत आले आहेत.

तर दुसऱ्याबाजूला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ईडी-सीबीआयच्या कारवाईच्या भितीने आणि भाजपाच्या आशिर्वादाने पक्ष फोडला असल्याची टीका करत पक्षात फूट पाडून भाजपासोबत गेलेले गद्दार असल्याची टीकाही सातत्याने करत आहेत. तसेच स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागता येत नाहीत म्हणून बापही चोरला असल्याचा आरोप अनेक वेळा केला आहे.

इतके सारे करूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार राखणार की असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनाच केल्याने बाळासाहेब ठाकरे यांचे राजकिय विचारांचे वारसदार असल्याचे दाखवून देत वक्फ विधेयकाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांना हिंदूत्वावादी राजकारणात केंद्र स्थानी आणण्याचा प्रयत्न केला आहे.

तसेच शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे हिंदूत्व आणि शिवसेना उबाठाचे हिंदूत्व हे वेगळे असल्याचे वारंवार सांगत आले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी नव्याने स्विकारत असलेल्या भूमिकेवरून पुन्हा एकदा हिंदूत्वाच्या भूमिकेवर आणण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे ९ खासदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागू राहिले आहे.

About Editor

Check Also

जयकुमार रावल यांची माहिती, गडचिरोली ग्रीन स्टीलचे जागतिक केंद्र म्हणून विकसित होणार महाराष्ट्राच्या हरित औद्योगिक विकासाला चालना

महाराष्ट्राच्या औद्योगिक भविष्यास नवी दिशा देणारा आणि शाश्वत औद्योगिकीकरणाला चालना देणारा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *