तीन टप्प्यातील या सवलतींसह ३० जून पर्यत ५ वा लॉकडाऊन केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई: प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सलग लागू करण्यात आलेल्या ४ थ्या लॉकडाऊनची मुदत उद्या संपत असून त्यास आता थेट एक महिन्याचा ५ वा लॉकडाऊन लागू करण्यात येत असल्याची घोषणा केंद्र सरकारने आज संध्याकाळी एका अध्यादेशान्वये जारी केला. मात्र या ५ व्या लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत.
सवलती ८ जून पासून लागू होणार असून पहिल्या टप्यात
कंटामेंन्ट झोनच्या बाहेरील सर्व देवस्थान, धार्मिक स्थळे खुली राहणार.
हॉटेल, रेस्टॉरंट यासह हॉस्पीटॅलिटीच्या सेवा सुरू होणार.
शॉपिंग मॉल्स.
आदी गोष्टी पहिल्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तर दुसऱ्या विभागातील-शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग सेंटर सरकारांशी चर्चा करून सुरु करता येणार आहेत. मात्र त्या जुलै महिन्यापासून सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
तिसऱ्या टप्प्यात– परिस्थितीपाहून:   आंतरराष्ट्रीय विमान प्रवासी वाहतूक ज्यांना केंद्रीय गृहविभागाने परवानगी दिलीय त्यांच्यासाठीच.
मेट्रो रेल,  चित्रपटगृहे, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थिएटर, बारस-ऑडीटोरियम, असेंब्ली हॉल-सिमिलर ठिकाणी सुरु होणार.
सामाजिक, राजकिय, धार्मिक, शैक्षणिक, मनोरंजनाचे जाहीर कार्यक्रम घेता येणार.

आंतरराज्य आणि राज्यांतर्गत  प्रवासासाठी आता कोणत्याही स्वरूपाच्या परवानगीची गरज राहणार नाही. विना परवानगी आता आंतरराज्यात आणि राज्यांतर्गत प्रवास करता येणार आहे.

About Editor

Check Also

एमपीएससी अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा माजी मंत्री आ. विश्वजीत कदम यांच्यासह काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोर्चात सहभाग

एमपीएससी MPSC च्या परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकार, अनियमितता, संशयास्पद मूल्यमापन, निकालातील गोंधळ आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांविरोधात एमपीएससी MPSC अध्यक्ष व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *