संजय शिरसाट यांची चौकशीची मागणी, निदा खानला एमआयएमचा आसरा इम्तियाज जलील यांच्यासह नगरसेवकांची चौकशी करावी

नाशिकमधील बहुचर्चित असलेले टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानला काल रात्री छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आली. तिला एमआयएमच्या नगरसेवकाने आसरा दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह त्यांच्या नगरसेवकांची चौकशी करावी अशी मागणी केली.

मंत्री संजय शिरसाट बोलताना म्हणाले की, संभाजीनगर मध्ये पोलिसांनी कारवाई करून नाशिक मधील धर्मांतराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला ताब्यात घेतले. दीड महिन्याच्या कालावधीत ती संभाजीनगर जिल्ह्यातील झोपडपट्टीच्या भागात लपली होती. निदा खान एकटी नसून तिच्यासोबत तिची आई आणि मावशी होती. यात एमआयएम पक्षाने तिला मदत केली. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मागे यासंदर्भात उघड वक्तव्य करत एका अर्थाने तिला पाठिंबा दर्शवला होता. मुंब्रा, पुणे, नाशिक अशा अनेक ठिकाणच्या प्रकरणांतून एमआयएम त्यांची गतीविधी वाढवण्याचा प्रयत्न करते. धर्मांतर करणे, मुलींना फसवणे असे सगळे प्रकार एमआयएमच्या महाशयांच्या नेतृत्वात होतात. निदा खान ही एक मोहरा आहे. महाराष्ट्रभर त्यांचे जाळे पसरले असल्याचा आरोपही यावेळी केला.

पुढे बोलताना संजय शिरसाट म्हणाले की, हिंदूंचा द्वेष करणे, त्यांचे धर्मांतर करणे अशा प्रकारांमुळे समाजात चीड निर्माण होऊ लागली आहे. आता चौकशीनंतर माहिती समोर येणारच आहे. परंतू, या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे. यातील मास्टरमाईंड कोण आहे, ते समोर यायला हवे. या प्रकरणाचे धागेदोरे पसरलेले असतील. एमआयएमचे इम्तियाज जलील आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर लोकांचीही चौकशी झाली पाहिजे. या चौकशीतून निश्चितच मोठे षडयंत्र महाराष्ट्राच्या समोर येईल. एमआयएमच्या निवडून आलेल्या ३३ नगरसेवकांपैकी किती नगरसेवक गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित आहे ते बघितले पाहिजे असेही यावेळी म्हणाले.

गेल्या एक ते दीड महिन्यांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये लपवून ठेवण्यासाठी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांची चौकशी करण्यात येणार असल्याचेही समजते.

About Editor

Check Also

पशुसंवर्धन सेवेतील ३१०३ अधिकारी पदांसाठी ११ जूनला परीक्षा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय सेवांवर पडणारा ताण कमी करण्यासाठी या पदांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *