दारू नको तर दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा उध्दव ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले

मुंबईः प्रतिनिधी
घरपोच ऑनलाईन दारू पोहोचविण्याचा प्रकार आक्षेपार्ह व धक्कादायक असल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली.
काही दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला घरपोच दारू पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. त्यावर एकाबाजूला राज्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर होत असताना दुसऱ्याबाजूला सरकारने मदत देण्याऐवजी ऑनलाईन दारू विक्रीला सुरुवात करत असल्याच्या निर्णयावर उध्दव ठाकरे यांनी टीका केली.
घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचविण्यापेक्षा राज्यातील दुष्काळग्रस्तांना तातडीने घरपोच मदत पोहोचवा असे राज्य सरकारला सुनावले.
ऑनलाईन दाऊ देणे हे आपल्या संस्कृतीला शोभणार नाही. पण राज्याची शोभा करण्याचा प्रयोग रोजच सुरु असल्याचे सांगून उध्दव ठाकरे यांनी दुष्काळी परिस्थितीकडे लक्ष वेधले.
ते म्हणाले, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती भयानक आहे. मंत्री फिरत आहेत. त्यांचे अहवाल येतील तेव्हा येतील. केंद्राकडे मदतीसाठी याचना होतील. दुष्काळग्रस्तांना पुन्हा रांगेत उभे करून मारू नका. त्यांना घरपोच दारू नकोय तर मदत हवी असल्याची आठवणही त्यांनी यावेळी सरकारला दिली.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा सवाल, याला जबाबदार कोण? निवडणूक आयोगाकडून मतचोरी आणि भाजपाला मदत होईल अशा कामकाजावरून केला सवाल

इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्राच्या कालच्या मुख्य पानावरच्या या मथळ्याखालच्या ’14 times in 10 months, two Election …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *