उपमुख्यमत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा सखोल चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून, या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  ​ कडक कारवाईचे आदेश

​या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे व पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधला.या दुर्घटनेच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी,अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

​आतापर्यंत या प्रकरणात ८ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाकडून संयुक्तपणे तपास सुरू असून, या विषारी दारूचा पुरवठा कोठून झाला आणि यात  कोणाचा सहभाग आहे, याचा शोध घेतला जात आहे,अशी माहितीही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

About Editor

Check Also

सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक काठमांडूकडे सुखरूप रवाना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तातडीच्या पुढाकारामुळे भाविकांची सुटका

कैलास मानसरोवर यात्रा पूर्ण करून परतीच्या प्रवासात तिबेटमधील सागा येथे अडकलेले महाराष्ट्रातील ३७ भाविक आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *