महाविकास आघाडीचे शिंदे सरकार विरोधात दिंडीच्या माध्यमातून अनोखे आंदोलन… सातव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार भ्रष्टाचारी मंत्र्याच्या विरोधात आक्रमक...

शेतकरी हैराण सरकार खातो गायरान… खोके लुटा कधी गायरान लुटा… सुरतला चला कधी गुवाहटीला चला… ५० द्या कुणी ८२ द्या, शिंदे सरकारला द्या…भूखंड घ्या कुणी गायरान घ्या सत्तारला द्या कुणी राठोडला द्या… गद्दार बोलो कभी सत्तार बोलो… राजीनामा द्या राजीनामा द्या,भूखंडाचा श्रीखंड खाणारे राजीनामा द्या… जनतेकडून पैसे घेणार्‍या अब्दुल सत्तार यांचा निषेध… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आजही भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या व सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

आज अधिवेशनाचा सातवा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईडी सरकारमधील मंत्र्यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. विधानपरिषदेच्या आवारातून ही दिंडी विधानसभेच्या पायर्‍यांवर काढण्यात आली. टाळच्या आवाजाने विधानभवनाचा परिसर दणाणून सोडला.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांना आशा, मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनविण्यात यूडब्ल्यूए महत्वपूर्ण भूमिका बजावेल मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया इंडिया, मुंबई कॅम्पसचे उद्घाटन

मुंबईला जागतिक दर्जाचे ज्ञान, नवोपक्रम, तंत्रज्ञान आणि प्रतिभेचे केंद्र बनविण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांना युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *