हसन मुश्रीम यांच्या घरावरील छाप्याचा राष्ट्रवादीकडून निषेध राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या कार्यालयावर आणि पुणे येथील त्यांच्या मुलांच्या घरावर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्यामुळे सरकारकडून आमदार हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सच्चा नेत्याला भय दाखवायचे काम होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केला.
सरकारच्या विरोधात बोलणाऱ्या, सरकारी निवेदनाला बगल देणाऱ्या तसेच सरकारी पक्षाच्या आग्रहाला जो बळी पडणार नाही त्याच्यामागे शुक्लकाष्ठ लावण्याचे धोरण सत्ताधारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
आमदार हसन मुश्रीफ हे एक सच्चा कार्यकर्त्यांमधील नेते आहेत. त्यांच्या कार्यालयात सांगली-कोल्हापूरमधील अनेक गोरगरीबांच्या आरोग्याच्या फाइल्स असून तेच मुश्रीफ यांचे खरे धन असल्याचे ते म्हणाले.

About Editor

Check Also

जयंत पाटील यांचा टोला, तुम्हाला १२ वर्षात जे करता आलं नाही, ते आम्ही तुमच्या आधी केलं सत्ताधाऱ्यांना टोले लागवत आणि चिमटे काढत जयंत पाटील यांनी कर्जमाफी योजनेची हवाच काढली !

२०१४ पर्यंत तत्कालीन राज्य शासनाने तिजोरीतून एकदाही कर्जमाफी केली नाही असे सत्ताधारी म्हणतात. २००८ मध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *