बारामती, माढासह ६ जागा रासपला द्या

राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांची भाजपकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणूकीत बारामती, माढा, हिंगोली, परभणी आणि अमरावती या सहा जागी राष्ट्रीय समाज पक्षाकडून उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. त्यामुळे भाजपने रासपला या ६ जागा द्याव्या अशी मागणी राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपकडे केली.

भाजपप्रणित लोकशाही आघाडीने मागील ५ वर्षात चांगले काम केले आहे. त्यामुळे पुन्हा केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच भाजपप्रणित रालोआचे सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे निवडणूक लढवित असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राष्ट्रवादी हा पक्ष शेवटची घटका मोजत असलेला पक्ष असून या वयातही शरद पवार यांना निवडणूक लढवावी लागते यावरून स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर येत्या २४ फेब्रुवारीला धनगर आरक्षण अंमलबजावणी मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानात आयोजित करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *