महायुतीतील मंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे दिग्रसचे आमदार संजय राठोड हे मागील काही वर्षापासून संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यातच त्यांच्याकडे कार्यकर्ती म्हणून रूजू झालेली एक मुलगी गर्भवती राहिली. तसेच त्या तरूण मुलीने आत्महत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात राज्यात एकच गदारोळ उडाला. त्याचबरोबर संजय राठोड आणि त्या मुलीचे कथित प्रेमसंबध असल्याची माहिती-ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या. मात्र सदर तरूणी पुण्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. याप्रकरणावरून सदर मुलीची हत्या करण्यात आल्याची संशयही भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी तत्कालीन सरकार विरोधात रणशिंग फुंकले. अखेर संजय राठोड यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता नेमक्या त्याच प्रकरणावरून उच्च न्यायालयाने पोलिसांना याप्रकरणाच्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले.
सदर तरूणी पुण्यात फेब्रुवारी २०२१ मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. हा अपघात होता की आत्महत्या? हा निष्कर्ष कोणत्या आधारे काढला ? अशी विचारणा उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारकडे केली. तसेच, तपासाचा तपशील न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.
शिवेसेना (एकनाथ शिंदे) नेते संजय राठोड यांच्याविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जनहित याचिकेतुन केली होती. त्या याचिकेवर मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश दिले.
संबंधित तरूणीचा मृत्यू आत्महत्या किंवा अपघाती होता या निष्कर्षावर पोहोचून पोलिसांनी प्रकरण बंद करण्याची शिफारस करणारा अहवाल कनिष्ठ न्यायालयात सादर केला होता. हा अहवाल न्यायालयानेही स्वीकारला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी देखील तपासावर आक्षेप घेतलेला नाही, असे सांगून न्यायालयात याचिका केली आहे, तरीही या तरूणीचा मृत्यू अपघाती होता किंवा आत्महत्या हा निष्कर्ष कोणत्या आधारावर पोलिसांनी काढला हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. तसेच, त्याबाबतचा तपशील न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.
तत्पूर्वी, ही तरूणी मद्याच्या नशेत घराच्या गच्चीत फिरत होती. त्यावेळी, गच्चीतून पडून तिचा मृत्यू झाला. डोक्याला दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवात स्पष्ट झाल्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले.
काय आहे प्रकरण?
टिकटॉक व्हिडोओसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील तरूणीचा ८ फेब्रुवारी २०२१ रोजी झालेल्या मृत्यूमुळे महाराष्ट्रातील एकूणच वातावरण ढवळून निघाले होते. राज्यातील राजकारणात एकच गदारोळ निर्माण झाला होता. सदर तरूणीचे राठोड यांच्याशी नाव जोडले गेले. तसेच, तिच्या राठोड यांच्याशी झालेल्या फोनवरील संभाषणाच्या ११ ऑडिओ रेकॉर्डिंग समाज माध्यमांवर प्रसारित झाल्या. राठोड यांनी राजीनामा दिला असला तरी त्याच्याविरोधात गंभीर स्वरुपाचे आरोप झालेले असतानाही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, असा आरोप करून राठोड यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसाठी वाघ यांनी २०२१ मध्येच उच्च न्यायालयात याचिका केली होती.
Marathi e-Batmya