वीज नियामक आयोगाच्या सदस्य पदी मुकेश खुल्लर यांची नियुक्ती लवकरच पदभार स्विकारणार

मुंबई : प्रतिनिधी

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव मुकेश खुल्लर यांची आज राज्याच्या वीज नियामक आयोगाच्या सदस्य पदी राज्य सरकारने नियुक्ती केली. मागील काही महिन्यांपासून वीज नियामक आयोगावरील दोन सदस्य निवृत्त झाल्याने आयोगाचे कामकाज ठप्प झाले होते. मात्र आता खुल्लर यांच्या नियुक्तीमुळे आयोगाचे कामकाज सुरु होण्यास मदत होणार आहे.

मुकेश खुल्लर हे २०१९ मध्ये निवृत्त होणार आहेत. मात्र त्यांच्या निवृत्तीला ८ ते ९ महिन्यांचा कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच त्यांची नियुक्ती आयोगाच्या सदस्य पदी केल्याने त्यांना आता सदस्य म्हणून पाच वर्षे सेवा करण्याची संधी मिळणार आहे.

About Editor

Check Also

चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय, ज्येष्ठ नागरिकांच्या अर्जांवर ९० दिवसांत निर्णय बंधनकारक महसूल विभागाकडून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कडक अंमलबजावणीचे आदेश

आई-वडील आणि ज्येष्ठ नागरिकांच्या चरितार्थ व कल्याणासाठीच्या प्रकरणांचा कायद्यानुसार ९० दिवसांच्या आत निपटारा होणे बंधनकारक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *