शेतकरी कर्जमाफीसाठी अर्ज करण्यास १५ जूनपर्यंत मुदतवाढ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी

शेतकरी कर्जमाफी योजनेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यापासून काही कारणाने अजूनही वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेत सहभागाची मुदत आता १५ जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

राज्यातील थकित कर्जधारक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-२०१७ अंतर्गत ऐतिहासिक व पारदर्शक कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ या कालावधीत थकबाकीदार असलेल्या परंतु २००८ आणि २००९ च्या कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्याची घोषणा केली होती. तसेच २००१ ते २०१६ या कालावधीत इमूपालन, शेडनेट आणि पॉलिहाऊस अशा मध्यम मुदतीचे कर्ज थकित असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेकाही कारणाने आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना या मुदतवाढीचा लाभ होणार आहे. त्याचप्रमाणे वन टाइम सेटलमेंट योजनेसाठी यापूर्वीच ३० जून २०१८ पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

About Editor

Check Also

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती, राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन एप्रिल २०२६ मध्ये ‘विशेष डिजिटल शेती शाळा

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *