मंत्रालयासमोर न्याय मागण्यांसाठी निदर्शने करणाऱ्या अंधानाही पोलिसी खाक्या सरकार दाद देईना आणि पोलिस आंदोलन करू देईना अशी अंधाची अवस्था

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या गलथान आणि ढिसाळ कारभारामुळे मंत्रालयात येवून किंवा मंत्रालयाच्या समोर निदर्शने  आपल्या न्याय मागण्यांच्या प्रश्नी दाद मागणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात आता अंध व्यक्तींनीही न्याय मागण्याच्या प्रश्नी दाद मागण्यासाठी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे आंदोलन उधळून लावण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने अंध व्यक्ती बाबत पोलिसांची असंवेदनशीलता दिसून आली.

साधारणत: दुपारच्या सुमारास दहा ते १२ अंध हे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आले आणि त्यांच्या विविध मागण्यांसाठी घोषणा देवू लागले. यावेळी पोलिसांनी या अंधाना अंध म्हणून न पाहता या अंधावर बळाचा वापर केला. पूर्णपणे अंध असलेल्या या मंडळीवर पोलिसांनी केलेला बळाचा करत प्रत्येकाला धरून त्यांना पोलिस गाडीत नेण्याचा प्रयत्न करत होते. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक असतानाही पोलिसांनी सहकार्याची भूमिका न घेता अंध आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर केला.

या अंधानी मंत्रालयाच्या बाहेर नियमबाह्य रित्या घोषणाबाजी केल्यामुळे बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी या अंधानी आम्ही आमच्या मागण्यासाठी येथे आलो आहोत असे सांगत आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करत होते. पोलिसांनी या अंधाना मंत्रालयाच्या गेट वरून जाण्यास सांगितले होते. मात्र या अंधानी आम्ही आमच्या न्याय मागण्या मागत असल्याचे सांगितले. अखेर पोलिसांनी या अंध आंदोलनकर्त्यांवर बळाचा वापर करत त्यांना ताब्यात घेवून मरिन लान्स पोलिस ठाण्यात रवानगी केली.

About Editor

Check Also

मोहम्मद जुनैद यांचा आरोप, दिल्ली पोलिसांची ओळख सांगून रात्रभर ताब्यात ठेवले आंदोलकांना जेवण पुरविल्याच्या मुद्यावरून कुटुंबाची चौकशी केली

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखालील ‘पेपर लीक’ विरोधी आंदोलनातील एका स्वयंसेवकाने आरोप केला आहे की, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *