मुंबई कॉंग्रेसच्या कार्यालयात सत्यनारायणाची पूजा निमित्त मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वाढदिवसाचे

मुंबई: प्रतिनिधी

धर्मनिरपेक्षता वादाचा बुरखा पांघरणाऱ्या कॉंग्रेस पक्षालाही निवडणूकांच्या विजयासाठी देवादिकांची आठवण यायला सुरुवात झाली. विशेष म्हणजे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई महापालिकेच्या समोर असलेल्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात चक्क सत्यनारायणाची पूजा आज घालण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांचा आज ६ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त काँग्रेसच्या मुंबई प्रदेश कार्यालयात सत्यनारायणाची पुजा घालण्यात आली. त्यासाठी संजय निरूपम समर्थक कार्यकर्त्यांसह काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आमंत्रण पाठविण्यात आले असून या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र मुंबई प्रदेश कार्यालयात दिसून आले. ही पुजा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने दिली.

विशेष म्हणजे काँग्रेस ही कोणत्याही धर्माच्या विचारधारेला मानणारी नाही. तसेच स्वत:ची प्रतिमा आणि विचारधारा धर्मनिरपेक्ष असल्याचे काँग्रेसकडून नेहमी सांगितले जाते. त्याचबरोबर ही प्रतिमा जपण्यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र मागील २५ वर्षात पहिल्यांदाच नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यालयात सत्य नारायणाची पुजा घालण्यात आल्याचे मतही या कार्यकर्त्याने व्यक्त केली.

About Editor

Check Also

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांना सवाल, तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे? हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यत पसरला आहे?

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *