संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी वाल्मिकी कराड आणि संशयित आरोपींची खाती गोठवली कराडच्या पत्नीसह अनेकांची सीआयडीकडून चौकशी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाने संपूर्ण राज्याला हादरा बसला आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी यामागणीसाठी नुकताच सर्वपक्षिय मोर्चा काढण्यात आला. तर दुसऱ्याबाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सातत्याने आंदोलन सुरु करण्यात येत आहे. तसेच अंजली दमानिया यांच्याकडून संतोष देशमुख यांच्या संभावित मारेकऱ्यांची माहिती दररोज पोलिस प्रशासन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बीडचे पोलिस अधिक्षक नवनीत कावथ आणि त्यांच्या सीआयडीच्या टीमने जवळपास वाल्मिकी कराड यांच्या पत्नीसह अनेकांची चौकशी सुरु केली असून संशयित मारेकऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची आणि त्यांची बँक खाती गोठविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे.

पोलिसांनी वाल्मिकी कराड याच्या पत्नी, संशयित मारेकरी यांच्यासह संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षा, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी जे वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जवळपास सर्वांचीच चौकशी सुरु केली आहे. तसेच वाल्मिकी कराड सध्या कोठे लपून बसला आहे, देशमुख यांचे मारेकऱ्यांचा ठावठिकाणी शोधण्यासाठी चौकशीचे सत्र सुरु आहे.

या चौकशी दरम्यान, अनेक आरोपींची मालमत्ता मोठ्या प्रमाणावर आणि त्यांच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणावर खंडणीच्या माध्यमातून गोळा केलेल्या रकमा असल्याची माहिती पुढे येताच पोलिसांनी वाल्मिकी कराड याच्यासह संशयितांची आर्थिक नाकेबंदी सुरु केली आहे. आर्थिक नाकेबंदीचाच भाग म्हणून पोलिसांच्या सीआयडीच्या पथकाने या सर्वांची बँक खाती गोठवून टाकली. त्यामुळे आर्थिक विवंचनेच्या पार्श्वभूमीवर हे संशयित आरोपी शरण येतील अशी अटकळ पोलिसांकडून व्यक्त येत आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वाल्मिकी कराड आणि त्यांच्या साथीदारांना वाटप करण्यात आलेल्या शस्त्रांस्त्र परवान्यांच्या चौकशीची मागणी केली असून बीडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र परवाने वाटपाचे कारण काय असा सवालही यावेळी केला. त्यामुळे पोलिसांच्या सीआयडी पथकानेही या शस्त्रास्त्र परवान्यांच्या वाटपाची चौकशी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

About Editor

Check Also

वर्षा गायकवाड यांचे पदोन्नतीमधील आरक्षणासंदर्भात पत्राद्वारे राष्ट्रपतींकडे मागणी सरकारी नोकरीतील पदोन्नतीमधील आरक्षणाची अंमलबजावणी करा

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा केवळ धोरणाचा विषय नाही तर तो एक घटनात्मक वचन आहे ज्याचा उद्देश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *